आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील 448 ब्लॅक स्पाॅटवर अाता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, स्मार्ट सिटी याेजनेतून खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वच्छ शहरांच्या यादीत घसरण झाल्यानंतर भाजपच्या कारभाऱ्यांनी अाता काहीही करून सुधारणेचा चंग बांधला असून त्याचाच एक भाग म्हणून अाराेग्य समितीच्या बैठकीत सभापती सतीश कुलकर्णी यांनी ४४८ पैकी जेमतेम ४० स्पाॅट तीन महिन्यांत नष्ट झाल्याची कुप्रगती बघून येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून कॅमेऱ्याद्वारे कचरा काेण अाणून टाकताे यावर नजर ठेवता येईल त्यावर दंडात्मक कारवाई करून प्रतिबंधात्मक कारवाई हाेईल. स्मार्ट सिटी याेजनेतून त्यासाठी खर्च हाेणार असून अायुक्तांनी परवानगी दिल्यास अाराेग्य समितीला पाच लाखांपर्यंत खर्चाचे अधिकार वापरले जातील, असेही स्पष्ट केले. 
 
अाराेग्य समितीच्या बैठकीत सभापतींनीच कचऱ्याच्या ब्लॅक स्पाॅटचा अाढावाघेतला. वारंवार सांगूनही ब्लॅक स्पाॅट कमी हाेत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शहरात सणासुदीची धामधूम संपल्यानंतरही अनेक ठिकाणी कचरा दिसत अाहे. त्यामुळे कचऱ्याच्या ब्लॅक स्पाॅटचे काय झाले? असा सवाल त्यांनी अाराेग्यधिकारी डाॅ. सुनील बुकाने यांना केला. त्यानंतर विभागीय स्वच्छता निरीक्षकांनी अाढावा दिला. त्यास सिडकाेमध्ये ६, नाशिकराेडमध्ये ३०, नाशिक पूर्वमध्ये ब्लॅक स्पाॅट नष्ट झाल्याचे सांगितले तर सातपूर नाशिक पश्चिम विभागीय स्वच्छता निरीक्षकांनी चक्क नागरिकांमध्ये प्रबाेधन सुरू असून दंडात्मक कारवाई सुरू असल्याचे उत्तर दिले. त्यावर सभापतींनी प्रबाेधन किती दिवस करतात, ब्लॅक स्पाॅट कमी करा असे सांगितले. दरम्यान, नागरिकांचा असहकार ही बाब लक्षात घेत दंडात्मक कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे सांगत सभापतींनी जेथे जेथे ब्लॅक स्पाॅट अाहेत तेथे कॅमेरे बसवण्याचे अादेश दिले. अायुक्तांशी चर्चा झाली असून स्मार्ट सिटी याेजनेतून कॅमेरे बसवण्याचे त्यांनी अाश्वासन दिले अाहे. तेथून निधी मिळाल्यास मात्र, अाराेग्य समितीला असलेल्या पाच लाखांच्या अधिकारातून कॅमेरे बसवू असे स्पष्ट केले. 
 
सभापती करणार दूध का दूध पानी का.... : ४४८ब्लॅक स्पाॅटपैकी किती ठिकाणे कायमस्वरूपी बंद झाले याची पाहणी करणार असल्याचा इशारा सभापतींनी दिला. विभागीय स्वच्छता निरीक्षकांनी जे ४० स्पाॅट बंद झाल्याचे सांगितले, त्याबाबत शंका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिकराेड विभागात सर्वाधिक ३० ब्लॅक स्पाॅट बंद झाल्याचे सांगतानाच निरीक्षकांनी हे स्पाॅट कर्मचारीच निर्माण करीत हाेते, असा गाैप्यस्फाेटही केला. एका ठिकाणी कचरा संकलनाच्या नादात हे स्पाॅट निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. पश्चिम विभाग हा उच्चभ्रूंचा असून येथील बड्या बंगलेवाल्यांच्या निष्काळजीपणामुळे डेंग्यूसाठी पाेषक पाणीसाठा हाेत असल्याची खंत सभापतींनी व्यक्त केली. फक्त तीन प्रभाग या विभागात असल्यामुळे विभागीय स्वच्छता निरीक्षक काय करतात अशी तंबीही दिली. 
 
 
बातम्या आणखी आहेत...