आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर सीसीटीव्ही नजरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस दलासमाेर मोठे आव्हान असून, हे अाव्हान अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणेच्या जोरावर ऐतिहासिक सोहळा सुरक्षितपणे पोलिस दल पार पाडेल, अशी ग्वाही देत शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सहा माहिन्यांनंतर कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार अाहेत. या माध्यमातून शहरावर अाता तिसऱ्या डाेळ्याची करडी नजर राहाणार अाहे असे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले.
पोलिस आयुक्तालयातील अद्ययावत सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे उद््घाटन शनिवारी पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बाेलत हाेते. याप्रसंगी अामदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलिस उपआयुक्त एन. अंबिका, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, पंकज डहाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, जगात कुठल्याही ठिकाणी इतक्या संख्येने भाविक येत नाहीत. गेल्या कुंभमेळ्याप्रसंगी चेंगराचेंगरीच्या घटनेचा अनुभव वाईट आहे. अशा घटना टाळण्यासाठी साधू-महंतांशी चर्चा करून शाहीमार्ग बदलण्यात यश आले. साधू-महंतांसह नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस दलावर आली आहे. पोलिस प्रशासन यामध्ये मोठी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला आहे. शहरात सहा महिन्यांनंतर कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन असल्याचे महाजन म्हणाले. याप्रसंगी ध्वनिक्षेपण यंत्रणेवर नागरिकांना कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

विभागनिहाय नियंत्रण कक्ष
नाशिकरोड, साधुग्राम, रामकुंड आणि वाहनतळ परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात अाले अाहेत. या विभागनिहाय िनयंत्रण कक्षांचे नियंत्रण उद‌्घाटन करण्यात अालेल्या या सीसीटीव्ही मुख्य नियंत्रण कक्षामधून केले जाणार अाहे.

कुंभमेळा लोकाभिमुख करणार
कुंभमेळा लोकाभिमुख होण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. सोनिया गांधी, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यासह दिल्लीतील नेत्यांना या साेहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. गिरीशमहाजन, पालकमंत्री

समाजकंटकांवर कारवाई
कुंभमेळ्यापूर्वीसराईत गुन्हेगारांसह समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले.

असे आहेत सीसीटीव्हंी नियंत्रण कक्ष
मुख्यनियंत्रण कक्षातून शहरातील सर्व रस्त्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. पंचवटी, दिंडोरीरोड, पेठरोड, साधुग्राम, शाहीमार्ग, रेल्वे स्टेशन, त्र्यंबकरोड या भागावर ३४८ सीसी टिव्ही कॅमेऱ्यांंद्वारे नजर ठेवली जात आहे. १२ मोठ्या स्क्रीनवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यंाचे प्रक्षेपण बघता येते. अप्रिय घटना घडल्यास बिनतारी संदेशाद्वारे पोलिसांची मदत मागता येते.

अद्ययावत मुख्य सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या उद‌्घाटनप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन यांना माहिती देताना पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन. समवेत अामदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी अादींसह मान्यवर.

खुनाच्या घटना संतापाच्या भरात
शहरातखुनाच्या वाढत्या घटनांच्या प्रकारावर पालकमंत्री महाजन यांनी सावध प्रतिक्रिया दिली. यातील बहुतांश घटनांमध्ये किरकोळ कारणांवरून खून झाले अाहेत. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे सांगून पोलिस यंत्रणेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

सर्वाधिक निधी केंद्र राज्याचा
सिंहस्थकुंभमेळ्यासाठी सर्वाधिक ७५ टक्के निधी केंद्र आणि राज्य शासनाने िदलेला आहे. उर्वरित २५ टक्के निधी नाशिक महापालिकेचा असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगून कोणी सिंहस्थ निधीबाबत श्रेय घेऊ नये, असे म्हणत अप्रत्यक्षपणे महापालिकेवर ताशेरे ओढले.

348 - सीसीटीव्ही कॅमेरे शहरात तैनात
12 - माेठ्या स्क्रीन नियंत्रण कक्षामध्ये
1324- ध्वनिक्षेपणाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करणार
06 - ठिकाणचे प्रक्षेपण एकाच स्क्रीनवर पाहता येणार-