आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही निविदापूर्व बैठकीत तक्रारींचा पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभ मेळ्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नाशिक शहर त्र्यंबकेश्वरमध्ये लावण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरा निविदापूर्व बैठकीत तक्रारींचा पाऊस पडला. निविदा घेण्यास इच्छुक कंपनी एजन्सींना बोलविण्यात आले होते. मात्र, पत्रकारांना या बैठकीपासून दूर ठेवले गेले. इतक्या गाेपनीयतेबाबत पोलिस प्रशासनाकडे उत्तर नसल्याने कॅमेरे लागण्यापूर्वीच पोलिस प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
बुधवारी (दि. १८) पोलिस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीस पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे, अधीक्षक संजय मोहिते, आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त निसार तांबोळी, पंकज डहाणे या अधिकाऱ्यांसह टाटा, रिलायन्स, एल अॅण्ड टी कंपनीसह शहरातील इलेक्ट्रॉनिक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य शासनाने काळ्या यादीत टाकलेल्या एका कंपनीला सल्लागार नियुक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. निविदा प्रक्रियेत संबंधित कंपनीने कॅमेरा बसवण्यासंबंधी पोलिस प्रशासनास अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र, या कंपनीने ताे दिला नसल्याची चर्चा बैठकीत झाली. कंपनीस कॅमेरा जोडण्यासंबंधी प्राथमिक ज्ञान नसल्याचे प्रशासनाकडून कंपनीला पाठीशी घालण्यात येत असल्याचे समजते. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे किती महत्त्वाचे आहेत, याचे गांभीर्य समजता केवळ निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिस प्रशासनाचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे.

बैठक गोपनीय
^निविदापूर्व बैठक होती. ९७ तक्रारी आल्या आहेत. विश्लेषण करण्यात येऊन पुढील निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बैठक गोपनीय होती. पंकडडहाणे, पोलिस उपआयुक्त

निविदेची अंदाजे रक्कम
सीसीटीव्ही बसवण्यास अंदाजे ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुमारे ५५० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्र्यंबकमध्ये तात्पुरते, तर शहरात कायमस्वरूपी ठेवण्याचे नियोजन आहे.