आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव काळात‘सीसीटीव्ही’द्वारे वॉच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थकाळात बंदोबस्तासह गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरलेली सीसीटीव्ही यंत्रणा गणेशोत्सव काळातही कायम ठेवण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख भागातील यंत्रणा कायम राहणार असल्यामुळे गणेशोत्सव काळात शहरात ‘सीसीटीव्ही’द्वारे ‘वॉच’ ठेवला जाणार असून, गणेशोत्सवानंतर नवरात्रातही शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा कायम ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यात सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिस प्रशासनाचे बंदोबस्ताचे काम सुकर झाले. लाखोंच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांसाठी खरोखरच तिसरा डोळा ठरले. कुठलाही अनुचित प्रकार घडता तीनही पर्वण्या निर्विघ्न पार पडल्या. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनीदेखील सीसीटीव्ही यंत्रणेमुळे नियोजन करणे सुकर झाल्याचे स्पष्ट केले आहे. सिंहस्थ काळात शहर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना सुकर झाले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या काळातही सीसीटीव्ही यंत्रणा गुन्हे नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कायम ठेवण्यासाठी पोलिस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत.

बाह्यपार्किंगवरून हटविणार
शहरातसुमारे ३४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यातील बहुतांश घाट मार्ग, भाविक मार्गांसह बाह्य पार्किंगच्या ठिकाणी आहेत. बाह्य पार्किंगवरील सीसीटीव्ही काढण्याचे काम सुरू असून, शहरातील प्रमुख भागातील सीसीटीव्ही कॅमेरे ‘जैसे थे’ राहणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

शहरातील यंत्रणा कायम ठेवण्याबाबत प्रस्ताव
शहरात लावण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा सणांमध्ये कायम ठेवण्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करणार आहे. बाहेरील कॅमेरे काढण्याचे काम सुरू असून, शहरातील कॅमेरे कायम ठेवण्यासाठी प्रस्ताव आहे. सचिनगोरे, सहायक आयुक्त