आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हजार बालकामगार शिक्षणाच्या प्रवाहात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मालेगावमध्ये आढळलेल्या 1100 बालकामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या 22 विशेष प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून कामगार उपायुक्त कार्यालयाने 843 बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. नियमित शाळेत त्यांना प्रवेश मिळवून देतानाच कार्यालयाकडून त्यांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. या सकारात्मक पावलामुळे या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय परिवर्तन होत आहे.

वाढत्या बालकामगारांची दखल घेत केंद्र शासनाने त्यांच्या पुनर्वसनासाठी 2004 पासून पावले उचलण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून 9 ते 14 वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पही वेगाने सुरू झाला. त्याच वर्षी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 2200 बालकामगार आढळले होत व त्यांच्यासाठी 44 केंद्रेही सुरू करण्याचे निश्चित झाले. मात्र, योजना सुरू होण्यास विलंब झाला. त्यानंतर पुन्हा 2005-06 मध्ये बालकामगारांचे सर्वेक्षण केले गेले. त्यात मात्र ही संख्या कमी झाली होती. पुढे 2007 मधील सर्वेक्षणात मालेगावमध्ये आढळलेल्या 1100 विद्यार्थ्यांसाठी 22 केंद्रे सुरू करण्यात आले होते.

सद्यस्थितीत सहा केंद्रे कार्यरत
बालकामगारांना प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर प्रगती पाहून त्यांना मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यानुसार विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आता केवळ सहाच केंद्रे कार्यरत असून, त्यातून 257 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे प्रथम शिक्षण विभागाकडून वार्षिक मूल्यांकन केले जाते व त्यांच्या वयोगटानुसार संबंधित वर्गात प्रवेश दिले जातात. त्यानुसार 2009-10 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात 993 बालकामगारांसाठी 19 केंद्रे, 2010-11 मध्ये 788 विद्यार्थ्यांसाठी 17 केंद्रे सुरू करण्यात आले आहेत.