आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅप्लिकेशन्सची दुनिया; धुमधडाका, खमंग फराळ अन‌् दिवाळी गेम्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फटाक्यांनी प्रदूषण हाेते... रांगाेळी काढायला जागाच नाही... फराळाचे पदार्थ करण्यासाठी रेसिपीच माहिती नाही... माेबाइलवर गेम खेळायचा, पण सणासुदीचे दिवस म्हणून घरातले माेबाइल हिसकावून घेतात.. एक ना एक अनेक प्रश्न... पण यंदा अाॅनलाइन अॅप्लिकेशन्सने हे सर्वच प्रश्न साेडविले अाहेत. दिवाळीनिमित्त अॅप्लिकेशन्सची दुनिया सज्ज झाली अाहे. माेबाइलला स्पर्श करताच फुटणारे फटाके, सुंदर रांगाेळ्या काढता येतील असे, तसेच रेसिपी शिकविणारे असंख्य अॅप्लिकेशन्स अाले अाहेत. दिवाळीचे गेम्सदेखील नव्या रूपात गुगल ‘प्ले स्टोअर’वर अाले अाहेत. 
 
दिवाळीनिमित्त सर्वत्र बाजारपेठा सजल्या अाहेत. सगळीकडे ग्राहकांची गर्दीदेखील दिसत अाहे. अशाच प्रकारची गर्दी गुगल प्ले स्टोअरवर दिसत नसली तरच नवल. अर्थात, ही गर्दी अाहे दिवाळीनिमित्त तयार करण्यात अालेल्या विविध अॅप्लिकेशन्स डाऊनलाेड करणाऱ्यांची. दिवाळीचा फराळ आवडीने खाणारे सर्वच असतात. मात्र, हे लज्जतदार पदार्थ नेमके बनवायचे कसे याबद्दल अनेकांना प्रश्नचिन्ह असतो. त्यामुळे अनेक गृहिणी पुस्तकांतील पाककृतींचा उपयोग करतात, परिणामी या काळात या पुस्तकांना चांगली मागणी असते. मात्र, यावर्षी फराळांच्या पाककृती सांगणारे अॅपच मोबाइलवर उपलब्ध झाल्याने गृहिणींसमोरील फराळाचा प्रश्न मिटला आहे. 
 
छाेटा भीमसह गेमचा ब्लास्ट 
दिवाळीनिमित्तस्पेशल गेम्स प्ले स्टोरवर उपलब्ध अाहेत. यात लहान मुलांना छोटा भीमचे असणारे आकर्षण लक्षात घेऊन छोटा भीम, छोटा ब्लास्टशिवाय फायर वर्क, दिवाळी क्रॅकर्स यासारखे गेम्स कंपन्यांनी तयार केले आहेत. यातील काही गेम्सला लाखाेंनी डाऊनलाेड मिळाले अाहेत. 
 
दिव्यांचे घड्याळ 
याअॅप्लिकेशनमध्ये दिव्याचा वापर करून कल्पकतेने घड्याळ केले अाहे. राॅकेटचा उपयाेग काट्यासाठी करून घड्याळ बनविण्यात अाले अाहे. हे घड्याळ दिवाळीच्या काळात माेबाइल वाॅलवर असेल तर अापला ‘टाइम’ अधिक गमतीशीर ‘पास’ हाेईल, ही यामागची मूळ कल्पना अाहे. 
 
महालक्ष्मी पूजनाचा विधी 
लक्ष्मीपूजनाच्याविधीसह अन्य काही धार्मिक विधी कसे करायचे, त्यासाठी काेणकाेणत्या सामग्रीचा वापर करायचा याची माहिती देणाऱ्या अॅपलाही चांगली पसंती दर्शविली जात अाहे. 
 
महालक्ष्मीचे दर्शन 
महालक्ष्मीचे प्रसन्न रूप असलेल्या चित्रांसाठीही काही अॅप्लिकेशन्सची निर्मिती करण्यात अाली अाहे. यात उपलब्ध हाेणारे फाेटाे तुम्ही वाॅलपेपर म्हणून ठेवू शकता किंवा काेणाला शुभेच्छा देण्यासाठीदेखील त्याचा वापर करू शकता. ‘लक्ष्मी मॅजिक शेक फाॅर दिवाली’ या अॅपमध्ये तर फाेटाेला स्पर्श करताच ताे बदलला जाताे. 
 
फाेटाे एडिट करताना पार्श्वभूमीवर दिवाळीचे वातावरणनिर्मिती करण्याची किमयादेखील काही अॅप्लिकेशन्सने केली अाहे. त्यात अापल्या फाेटाेच्या मागे फटाक्यांची अातषबाजी किंवा दिव्यांची माळ किंवा लखलखणारा अाकाशदिवाही दिसू शकताे. 
 
खमंग फराळाच्या शेकडाे रेसिपीज् 
दिवाळीफराळ (राधिका पेनाविकर), दिवाळी फराळ रेसिपी (फेरी डेव्स), दिवाळी फराळ (श्री येडू अॅप्स) अशा नावांच्या या अॅप्लिकेशन्सला काही हजारांहून अधिक मोबाइलधारकांनी डाउनलाेड केले अाहे. फराळात बेसनचे लाडू, चकली, करंजी, शंकरपाळे, पोह्यांचा चिवडा, रव्याचे लाडू आणि शेव हे पदार्थ कसे बनवायचे याबद्दल सविस्तर माहिती आहे. त्यामुळे फराळ करताना गृहिणींच्या हातात माेबाइल असल्यास अाश्चर्य वाटू नये. 
 
थ्रीडी वाॅलपेपर अन् शुभेच्छापत्र 
यातसर्वाधिक अॅप्सची संख्या अाहे ती दिवाळीचे ग्रीटिंग्ज अाणि वाॅलपेपरची. लखलखणारे दिवे, चकाकणारा अाकाशदिवा, फटाक्यांची अातषबाजी या सर्व बाबींचा समावेश करून तयार झालेले हे ग्रीटिंग्ज व्हाॅट्स अॅप किंवा फेसबुकसारख्या साेशल मीडियावर पाठविणे साेपे जाते. शिवाय, काही अॅपमध्ये ज्याला ग्रीटिंग पाठवित अाहाेत अाणि जाे ते पाठवित अाहे, त्यांची नावे टाइप करण्याचीही सुविधा देण्यात अाली अाहे. त्याचप्रमाणे दिवाळीचे थ्रीडी वाॅलपेपर उपलब्ध करून देणारे अॅप्लिकेशन्सही माेठ्या संख्येने उपलब्ध अाहेत. 
 
ऑनलाइन ‘धुमधडाका’ 
दिवाळीच्याफटाक्यांनी वायू अाणि ध्वनिप्रदूषण हाेत असल्याची बाब सर्वश्रुत अाहेच. परंतु फटाके दिवाळीत नाही तर मग कधी वाजवायचे असाही प्रश्न उपस्थित हाेताे. त्यावर काही अॅप्लिकेशन्समध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यात अाला अाहे. हे अॅप्लिकेशन डाऊनलाेड केल्यास त्यावरच फटाक्यांचे अॅनिमेशन्स बघायला मिळतात. त्याला स्पर्श केल्यास त्यातून फटाका फुटताे तसा धमाकाही हाेताे. 
 
बातम्या आणखी आहेत...