आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, २३ हजार ५०० चाैरस मीटरवरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत २३ हजार ५०० चाेरस मीटरवरच हाेणार असून या जागेवर १५ अाॅगस्ट राेजी सरकारचा फलक लागणार अाहे. या इमारतीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया हाेत असल्याचे शनिवारी (दि. ५) स्पष्ट झाले. महापालिकेने या क्षेत्रापैकीच ४० टक्के क्षेत्राचे टीडीअार प्रमाणपत्रही अंतिम केले अाहे. 
 
पंधरा वर्षांपेक्षाही अधिक काळ चर्चेत राहिलेल्या त्र्यंबकराेडवरील पाेलिस प्रशिक्षण अकादमीसमाेरील जागेवर अखेर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे इमले उभे करण्यासाठी प्रक्रिया गतिमान झाली अाहे. दरम्यान, प्रशासकीय इमारतीसाठी ३० हजार चाैरस मीटर क्षेत्रापैकी ६० टक्के राेखीत उर्वरित ४० टक्के टीडीअार यापद्धतीने भुसंपादन करण्याचे महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तसेच विभागीय अायुक्तांच्या पत्रात ताेडगा निघाल्याचे म्हटलेले हाेते. मात्र उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक यांनी २३ हजार २३ हजार ५०० चाैरस मीटर क्षेत्रापैकी ६० टक्के राेख तर ४० टक्के टीडीअार स्वरूपात देण्याबाबतचे पत्र महापालिकेला दिल्यामुळे पेच निर्माण झाला. दरम्यान, महापालिकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून २३ हजार ५०० चाैरस मीटर क्षेत्रापैकी ४० टक्के टीडीअार देण्याबाबतच अादेश असल्याची खातरजमा करून तसे प्रमाणपत्र शनिवारी अंतिम केले. 

२३ हजार चाैरस मीटरवरच टीडीअार प्रमाणपत्र 
^शासनाच्या अादेशानुसार मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी २३ हजार ५०० चाैरस मीटर क्षेत्राच्याच ४० टक्के याप्रमाणे टीडीअार प्रमाणपत्र अंतिम केले अाहे. उर्वरित क्षेत्र डी. पी. रस्त्याबाबत असल्यामुळे भविष्यात भूसंपादनासाठी स्वतंत्र निर्णय हाेईल. -अभिषेक कृष्णा, अायुक्त, महापालिका 

१५ अाॅगस्टला भूमिपूजनाचा नारळ फुटण्याची चिन्हे 
पंधरा वर्षे रखडलेली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी शनिवारी पालिकेने टीडीअार प्रमाणपत्र अंतिम केल्यामुळे भूसंपादन अंतिम टप्प्यात अाल्याचे दिसत अाहे. पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत १५ अाॅगस्ट राेजी या प्रकल्पाच्या भुमीपूजनाचा नारळ वाढवला जावू शकताे. इमारतीचे अारेखन निविदा प्रक्रियाही सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारणीसाठीच्या या वेगवान घडामाेडीमुळे पंधरा वर्षापासून प्रतीक्षा असलेला हा विषय मार्गी लागला अाहे. 
 
६५०० चाै. मी जागेचे काय हाेणार ? 
२३हजार चाैरस मीटर क्षेत्रावर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे उर्वरित ६५०० चाै. मी. क्षेत्रातील डी. पी. रस्त्याचे भूसंपादन काेण कसे करणार हा प्रश्न अाहे. भविष्यात ६५०० चाै. मी. क्षेत्र महापालिकेमार्फत डी. पी. रस्त्याकरिता संपादित हाेऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. मात्र त्यासाठी राेख पैसे दिले जातात की टीडीअारचा पर्याय वापरला जाताे, याबाबत उत्सुकता अाहे. पालिकेची सध्याप्रमाणे अार्थिक परिस्थिती खराबच राहिली तर सर्व क्षेत्र टीडीअार स्वरूपात संपादित करण्याची तयारी दाखवली जाईल का, असे प्रश्न चर्चेचा विषय ठरले अाहेत. 

 
बातम्या आणखी आहेत...