आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Central Excise Account Office,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबकारी खात्याचे अपिलेट कार्यालय जाणार नागपूरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्रीय अबकारी खात्याने नाशिकच्या उद्योजकांना झटका दिला असून, स्थानिक अपिलेट कार्यालय पुढील महिन्याच्या १६ तारखेपासून नागपूरला स्थलांतरित होणार आहे.
ई-गव्हर्नन्सकरिता प्रयत्नरत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात या प्रकारचे निर्णय उद्योगांसाठी वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने याबाबत उद्योजकांत संताप व्यक्त होत आहे. याबाबतचे पत्र नुकतेच केंद्रीय अबकारी कर खात्याने काढले असून, अबकारी कराच्या संदर्भात अपील करण्याकरिता उद्योजकांना आता थेट नागपूरला जावे लागणार आहे. यामुळे दोन तासांऐवजी तीन दिवस आला आणि हजारो रुपयांचा खर्चही उद्योजकांना सहन करावा लागणार आहे.
नाशिकमध्ये पाच हजारांच्या आसपास उद्योग कार्यरत असून, या उद्योगांना अबकारी कराच्या संदर्भाने काही तक्रारी असतील किंवा त्रुटींबाबत नोटिसा आल्‍या किंवा अगदी अपीलही करायचे असले तरी औरंगाबाद येथे असलेल्या आयुक्तालयात जावे लागत हाेते. यामुळे हे कार्यालय नाशिकला सुरू व्हावे, याकरिता उद्योजक संघटनांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यानंतर सुमारे दहा वर्षांपूर्वी औरंगाबाद कार्यालयाशी संलग्न अपिलेट कार्यालय नाशिकमध्ये गडकरी चौकात सुरू करण्यात आले होते. चार अपिलीय अधिकारी त्यात कार्यरत होते, त्यामुळे चुकीचा करभरणा, अर्जात चुकीची माहिती भरलेली असणे किंवा काही त्रुटी असणे किंवा विभागाकडून काही कारणाने बजावलेली नोटीस असेल तर त्याबाबत काही तासांत येथे उद्योजकांना अपील करून बाजू मांडता येत होती प्रकरणे निकाली काढता येत होती. ही सुविधा आता बंद होणार आहे. प्रकरणांची घटती संख्या त्यामुळे अधिकाऱ्यांवरील खर्च परवडणारा नसल्याचे कारण विभागाने दिले आहे