आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे शहरात ‘धक्का मारो’ आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तू व इंधनाची दरवाढ होत असल्याचा आरोप करत शहर व जिल्हा कॉँग्रेसच्या वतीने रविवारी ‘धक्का मारो’ आंदोलन करण्यात आले. या वेळी दुचाकीला धक्का मारत मोर्चा काढण्यात आला. कॉँग्रेस कमिटी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात प्रथमच पदाधिकारी रस्त्यावर उतरले, तर बहुतांश कार्यकर्त्यांनी वाहने चालवित सरकारचा निषेध केला.
जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) व शहराध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनास प्रारंभ झाला.
या मोर्चात महागाई व इंधन दरवाढ केल्याबद्दल मोदी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी ‘मोदी सरकार हाय हाय’ अशा स्वरूपाच्या जोरदार घोषणा दिल्या. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, पानगव्हाणे, बोरस्ते, शरद आहेर, भारत टाकेकर, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, तुषार जगताप यांनी दुचाकीस धक्का देत आंदोलनात भाग घेतला. हुतात्मा स्मारकात मोर्चाचा समारोप करण्यात आला.
भाजप सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
पानगव्हाणे, शरद आहेर, बोरस्ते, डॉ. बच्छाव यांची भाषणे झाली. नगरसेवक लक्ष्मण जायभावे, योगिता आहेर, समिना मेमन, रमेश कहांडोळे, संदीप गुळवे, प्रकाश शिंदे, अनिल ढिकले, कल्पना पांडे, भिवानंद काळे आदींसह कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता. आंदोलनानंतर हुतात्मा स्मारकाबाहेर राहुल दिवे, तुषार जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी तातडीने आंदोलनकर्त्यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यात आले.