आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये जेलची सुरक्षा पुन्हा रामभरोसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहाने आपल्या सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा केली आहे. प्रवेशाच्या रस्त्यावरील जुने बॅरिकेट्स काढून अडथळा ठरणारे जास्त उंची असलेले जाळीचे नवीन बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र, समोरील सुरक्षाव्यवस्था बळकट करताना उर्वरित बाजूंचा मात्र पुरेसा विचार केलेला दिसत नसल्याने कारागृहाची सुरक्षा पुन्हा रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे हे महत्त्वाचे कारागृह असून येथे मुंबई बाँबस्फोट, टोळीयुद्धातील व गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. कैद्यांच्या भेटीसाठी येणारे त्यांची वाहने थेट प्रवेशद्वारापासून नजीकच्या गेटपर्यंत येत असल्याने कारागृह प्रशासनाने प्रवेशाच्या रस्त्यावरील बॅरिकेट्स नव्याने टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेलरोड रस्त्यावरून दिसणारे कारागृहाचे प्रवेशद्वार आता दिसेनासे झाले आहे. वाहन घेऊन कोणालाही आतमध्ये प्रवेशास बंदी केली आहे.

आम रस्त्यामुळे बंदी अशक्य
भीमनगर ते गोरवाडी रस्त्यालगत कारागृहाची शेती, अधीक्षकांचे निवासस्थान असले तरी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. -वसंतराव वानखेडे, वरिष्ठ अधिकारी, मध्यवर्ती कारागृह

भिंतीचा प्रस्ताव प्रलंबित
कारागृह प्रशासनाने समोरून सुरक्षेत सुधारणा केली. मात्र, तिन्ही बाजूंची सुरक्षा रामभरोसे आहे. जेलरोडच्या बाजूने कारागृह वसाहत, झोपडपट्टी असून संरक्षक भिंतीचा प्रस्तावही प्रलंबित आहे