आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनाही मिळणार आधार; दोन ते तीन दिवसांत सुरू होणार नोंदणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आधार कार्ड सर्वांनाच दिले जाते. मात्र, कैदी यातून सुटत असल्याने आता त्यांच्यासाठीदेखील कारागृहातच आधार कार्डची व्यवस्था करण्यात येणार असून, दोन ते तीन दिवसांत तेथे 10 आधार कार्डचे किटही उपलब्ध करत नोंदणीस सुरुवात केली जाणार आहे. शासनाने देशभर आधार कार्ड नोंदणीची मोहीम राबवित प्रत्येक व्यक्तीला एक ‘युनिक आयडेंटिफिकेशन’ची अर्थात आधार कार्डची सुविधा सुरू केली. मात्र, यातून कारागृहातील कैदी वंचित राहात होते. आता राज्य शासनाने त्यांनाही आधार कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत थेट कारागृहातच त्याच्यासाठी नोंदणीची व्यवस्था केली आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कारागृह व्यवस्थापन, संबंधित पोलिस ठाणे किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून कागदपत्रे घेतली जाणार आहेत. ज्या कैद्यांना शिक्षा झाली आहे, त्यांच्याबाबत अडचणी नसून, त्यांची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. केवळ ज्यांची प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत अशांचीच अडचण आहे. त्यांच्या नातेवाईकांकडूनच ती कागदपत्रे घेतली जाणार आहे. याबाबतच्या सूचनाही राज्याच्या अपर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी नाशिक येथूनच व्हिडिओ कॉन्फरन्स घेत संपूर्ण राज्याच्या पोलिस आणि कारागृहांच्या अधिका-यांना दिल्या.