आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य रेल्वेची वाहतूक दोन दिवसांनंतर सुरळीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड: गेल्या दोन दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी पूर्वपदावर आली. दोन्ही ट्रॅकवरून वाहतूक सुरू झाली असली तरी सर्वच गाड्या तीन ते चार तास उशिराने धावत आहेत.
नाशिकरोड रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या अस्वली ते पाडळी स्थानकांदरम्यान कंटेनर घेऊन जाणार्‍या मालगाडीचे 20 डबे रुळावरून खाली घसरल्याने गुरुवारपासून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर दोन दिवसांत अनेक गाड्या रद्द झाल्या. तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे शनिवारीही प्रवाशांना धास्तीच वाटत होती. मात्र, गाड्या रद्द झाल्या नाही. त्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना काही काळ वाट पाहावी लागली.