आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे साेशल इकाॅनाॅमिक अाॅडिट, स्मार्ट सिटी अमृत याेजनेला गती देण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्टसिटी, अमृत स्वच्छ भारत अभियानाचा पुढील टप्पा म्हणून शहरांच्या विकासासाठी केंद्र शासनाने अाता साेशल इकाॅनाॅमिक अाॅडिट अर्थातच आर्थिक सामाजिक मूल्यांकन सुरू केले आहे. त्यात नाशिक महापालिकेचाही समावेश असून केंद्र शासनाने मागवलेली माहिती पाठवण्याची तयारी महापालिकेने सुरू केली अाहे. या माहितीमधून काेणत्या शहराचे श्रेणी वा दर्जा काय हे ठरवण्याचा प्रयत्न असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे.

शहरांतील जीवनमान उंचावण्यासाठी नानाविध याेजना हाती घेऊन शहरी मतदारांना अाकर्षित करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात अाहे. त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी स्मार्ट सिटी, अमृत याेजना, स्वच्छ भारत याेजनेतून काेट्यवधी रुपयांचा निधीही देण्यात अाला. मात्र, अाता काेणत्या शहराची विकास क्षमता काय हे ठरवून त्या अनुषंगाने पुढील नियाेजनासाठी प्रयत्न हाेणार अाहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने पुढाकार घेतला अाहे.
 
असे हाेईल मूल्यांकन : शहराचेस्थान, विस्तार वा अाकार, गव्हर्नन्स, ओळख, सांस्कृतिक रचना, शिक्षणाचा स्तर, आरोग्य सुरक्षितता, आर्थिक स्थिती रोजगाराची उपलब्धता, घरे, सार्वजनिक मोकळे भूखंड, जमिनीचा वापर, विद्युत पुरवठा, वाहतूक व्यवस्था, शाश्‍वत पाणीपुरवठा, मलनि:सारण व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, लोकसंख्येची घनता याचे नाशिकसंदर्भात मूल्यांकन केले जाणार अाहे.
 
यांची हाेणार निवड
५०हजारपेक्षा कमी, ५० हजार ते पाच लाख लोकसंख्या असलेली, दहा लाख ते ५० लाख ५० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली मेट्रो सिटी असे चार प्रकारांत मूल्यांकन केले जात अाहे. प्रामुख्याने, सरकारी योजनांमध्ये लाेकांचा सहभाग, संस्थांचे याेगदान, सामाजिक अार्थिक स्थिती, नैसर्गिक रचना अादींचा अभ्यास केला जाणार अाहे. नाशिक महापालिका तिसऱ्या प्रकारात माेडत असून, पंधरा विविध मानांकनाबाबत महापालिकेकडून माहिती मागवण्यात अाली अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...