आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिक्षणशास्त्र’च्या प्रवेशासाठी सीईटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच शिक्षणशास्त्राच्या बी.एड. एम.एड. या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य शासनातर्फे प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी बी.एड. एम.एड. पदवी शिक्षणक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात अाले आहे. मविप्रच्या अॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी या प्रवेश परीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. 

बी.एड.साठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे, शिवाय तृतीय वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनाही सीईटी प्रवेश परीक्षा १३ १४ मे रोजी होणार आहे. तर, एम.एड.साठी एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात मोफत मार्गदर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. डॉ. सी. एम. बोरसे यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...