आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीबीएस, डेंटलसाठीच सीईटी ठेवण्याचा विचार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सर्व शाखांच्या प्रवेशासाठी आवश्यक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) केवळ एमबीबीएस व डेंटल शाखांसाठीच लागू असावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कार्यक्रमानंतर गावित पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मेडिकलच्या आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग या शाखांच्या जागा रिकाम्या राहतात. सध्या नीट, महाराष्ट्र शासनाची सीईटी आणि खासगी मेडिकल असोसिएशनची सीईटी अशा तीन प्रवेश परीक्षा होतात. यासाठी नियंत्रण समिती गठित असून, तीच या सीईटीव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार परवानगी देत नाही.