आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटीचा निकाल लागला, पण सर्व्हर डाउन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर झाला. पण, सकाळी 11 वाजेपासून तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळाचे सर्व्हरच डाउन असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
यंदा प्रथमच इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाने परीक्षेचे आयोजन केले. सुरुवातीपासूनच या परीक्षेबाबत तज्ज्ञांकडून शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. निकाल जाहीर होताच नियोजनशून्यतेची प्रचिती विद्यार्थ्यांना आली.


आश्चर्यकारकरीत्या मध्यरात्रीच निकाल
तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी सकाळी 11 वाजता संकेतस्थळावर निकाल जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात निकाल मंगळवारी मध्यरात्रीच संकेतस्थळावर उपलब्ध झाले. सकाळी 11 वाजता निकालासाठी सर्व्हरच डाउन झाले.

एमबीए कॅप राउंडचीही तीच तर्‍हा
विविध व्यवस्थापन शाखांचे कॅप राउंड (कागदपत्र तपासणी) ऑनलाइन सुरू आहे. सीईटीचे निकालही जाहीर झाल्यामुळे सर्व्हर डाउन झाले. त्यामुळे ना सीईटीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहाता आले, ना एमबीएसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना आपल्या कागदपत्रांची तपासणी करता आली.

एसएमएस पाठवले; पण..
तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना तिन्ही (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) विषयांचे गुण एसएमएस पाठवून कळवण्यात आले; मात्र बर्‍याच विद्यार्थ्यांना ते पोहोचलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी ते संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी गर्दी केली. पण, तेथेही सर्व्हर डाउन झाल्याने त्यांची निराशा झाली.