आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये भुजबळ पुन्हा सक्रिय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ पुन्हा सक्रिय झाले असून, शनिवारी सायंकाळी भुजबळ फार्मवरील बैठकीत त्यांनी प्रमुख विभागांच्या अधिकार्‍यांसमवेत सिंहस्थ कामांचा आढावा घेतला. रविवारी (दि. 25) ते येवला विधानसभा मतदारसंघासही भेट देणार आहेत.
लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यामुळे भुजबळांनी नाशिककडे पाठ फिरवल्याची चर्चा होती. मात्र, निकालानंतर आठवडाभरातच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. जिल्हाधिकारी विलास पाटील, महापालिका आयुक्त संजीवकुमार यांच्यासह महत्त्वाच्या खातेप्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी कुंभमेळ्यातील कामांसह ग्रामीण भागातील प्रमुख रिंगरोडचा आढावा घेतला. पाणी प्रश्नापासून खरिपाच्या नियोजनाचीही माहिती घेतली. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भुजबळ फार्म गजबजल्याचे चित्रही या निमित्ताने दिसले.