आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका आयुक्तांनी खंबीरपणे कारवाई करावी : भुजबळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकमधील गोदेच्या प्रदूषणाची समस्या ‘जैसे थे’ असून, पालिका आयुक्तांनी त्यावर खंबीरपणे कारवाई करताना कुणाच्याही दबावाला बळी पडू नये, अशा शब्दात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी पालिका आयुक्तांना कानपिचक्या दिल्या.

येथील रावसाहेब थोरात सभागृहात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉर्मस आणि वुमन्स सोसायटी फॉर एन्व्हायर्नमेंट कल्चर अँँड एज्युकेशन संस्थेच्या वतीने ‘केअर नाशिक ग्रीन हॉल’ या प्राचार्यांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना भुजबळ यांनी शहरात होर्डिंग्जमध्ये झाकल्याने विद्रूपीकरणही थांबविण्याची गरज असल्याचे भुजबळ म्हणाले.

पालिका आयुक्त संजय खंदारे यांनी गोदा प्रदूषणाबाबत पालिका गंभीर असून, कार्बन फूटप्रिंट मोजण्याचा आराखडा सादर केला जाणार असल्याचे खंदारे यांनी नमूद केले. निर्लेप उद्योग समूहाचे राम भोगले यांनी पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असून ती प्रत्येकाने पार पाडणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी चेंबरने नाशिकची स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी मानून, शिक्षणक्षेत्रात त्याचे महत्त्व पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.

या वेळी चेंबरच्या वतीने एका माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनर्शी हरदास यांनी केले. या वेळी डॉ. मो. स. गोसावी, आशिष पेडणेकर, हिवरेबाजारचे सरपंच पोपट पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपणच जबाबदार
नाशिकमध्ये अस्वच्छता, अतिथ्याची उणीव आणि गोदेचे प्रदूषण या प्रमुख समस्या आहेत. कुणाचाही दबाव सहन न करता आयुक्तांनी कडक पाऊले उचलावी. पूर्वी नाशिकमधील पुराचे पाणी सहजपणे नदीला मिळायचे. मात्र काही नैसíगक नाले बुजवून किंवा त्यावर बांधकामे झाली आहेत. निसर्गाची व्यवस्था आपणच मिळूनच बिघडवत असून नैसर्गिक आपत्तीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक