आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chagan Bhujbal Responsible For Not Getting Reservation For Maratha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही तर राज्‍यात महाभारत होईल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेला शब्‍द पाळला नाही. ते धड इकडची भूमिका घेतात न तिकडची. मराठ्यांना जर आरक्षण मिळाले नाही तर राज्‍यात संतापाची लाट पसरेल आणि महाभारत होईल, असा इशारा राष्‍ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी नाशकात दिला. नाशिकमध्‍ये शिवसंग्राम मेळाव्‍यात मेटे यांनी राष्‍ट्रचादीचेच नेते मंत्री छगन भुजबळ यांच्‍यावर टीकेची झोड उठवली.

मराठा आरक्षणाबाबत राज्‍यकर्त्‍यांना भान राहिलेले नाही. भुजबळांनी मराठ्यांचा विश्‍वासघात केला आहे. ओबीसींच्‍या 22 टक्‍के आरक्षणाला धक्‍का न लावता मराठयांना 25 टक्‍के आरक्षण देण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली.

रेणके आयोग हा मराठी विरोधी असून हा आयोग भुजबळांच्‍या मर्जीतला आहे. या आयोगातील माणसे जातीयवादी असल्‍याचा आरोपही त्‍यांनी यावेळी केला.