आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाच्या तडाख्याने शहरवासीय हैराण, विराेधाभासाचे हवामान ठरतेय त्रासदायक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - परतीच्या पावसाने शहरात धुमाकूळ घातल्यानंतर आता पहाटे धुक्याची झालर, तर दुपारी उन्हाचा तडाखा यामुळे सकाळी गारवा अाणि दुपारी उकाडा अशा विरोधी वातावरणाने शहरवासियांचा जीव कासावीस होत आहे. बुधवारी किमान १७.५, तर कमाल ३३.५ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. 
 
जिल्ह्यात सप्टेंबरमध्येच उकाडा वाढल्याने आॅक्टोबर हीटचा नेहमीपेक्षा १५ दिवस अाधीच अनुभव अाला. त्यानंतर आॅक्टोबरच्या प्रारंभीला परतीच्या पावसाने शहरासह जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे या महिन्यात पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंचा अनुभव नाशिककरांना मिळाला. 

दोन दिवसांपासून शहरात सकाळी सूर्योदयापूर्वी धुक्याची दाट झालर दिसत असल्याने शहरवासीय याचा अनुभव घेताना दिसत होते. बुधवारी मात्र सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने चटका सहन करावा लागत होता. कमाल तपमान मात्र तीन दिवसांपासून ३३ अंशांच्या दरम्यान आहे. 
बातम्या आणखी आहेत...