आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही फुटेजमुळे सोनसाखळी चोर जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील मध्यवर्ती भागात परिसरात सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भिवंडी येथे अटक केली. सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. शहरातील सीसीटीव्हीने या संशयिताची छबी टिपल्याने त्यावरून माग काढत पाेलसांनी ही कारवाई केली. संशयिताकडून सोनसाखळी चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. सुमारे सव्वाचार लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनसाखळी चोरी करणारा भिवंडी येथील सराईत गुन्हेगार नाशिक शहरात येऊन महिलांच्या साेनसाखळींची चाेरी करून फरार होत असल्याची माहिती सरकारवाडा पाेलिसांना मिळाली होती. 

पोलिस ठाण्यात पाच महिलांची सोनसाखळी चाेरल्याच्या गुन्ह्यात या गुन्हेगाराचा सहभाग असल्याने परिसरातील सर्व सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासण्यात आले. तीन ते चार ठिकाणी हा संशयित दुचाकीवर अाढळून अाला. या चित्रिकरणातील वर्णनानुसार मिळालेल्या माहितीच्या अाधारे हा संशयित भिवंडी येथील असल्याचे स्पष्ट झाले. संशयितास भिवंडी पोलिसांच्या मदतीने पाेलिसांनी अटक केली. चाैकशीत पाच सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यातत १४ तोळे सोने, दुचाकी असा सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात अाला. 
वरिष्ठ निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहायक निरिक्षक सारिका अहिरराव, शिवाजी भालेराव, पंकज पळशीकर, प्रवीण वाघमारे, शेळके, प्रशांत मरकड, संगम खरपाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली, पथकाचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी अभिनंदन केले. संशयिताकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत. संशयिताला शहरातील काही गुन्हेगारांकडून मदत होत असल्याचा संशय पाेलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...