आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनसाखळी अाेरबाडणाऱ्या चाेराला पकडले नागरिकांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अोरबाडून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजता डोंगरे वसतिगृह मैदान ते कुलकर्णी गार्डन रस्त्यावर हा प्रकार घडला. नागरिकांनी दाखवलेली जागरूकता आणि पोलिसांनी दाखवलेल्या चपळाईने प्रथमच सोनसाखळीचोर चाेरी करताना पकडला गेला. याबाबतचा 'दिव्य मराठी'चा हा लाइव्ह रिपाेर्ट...
सोनसाखळीचोर दुचाकीने येथे चोरी करतात. यावेळी मात्र पायी चोरी करण्याच्या प्रयत्नात असणारा संशयित नागरिकांच्या मदतीमुळे पोलिसांच्या हाती लागला. वेळ सकाळी १०.३० ची.. तक्रारदार महिला शोभा दयाराम कापडणीस (३०, रा. गंगापूरराेड) या डोंगरे वसतिगृह रस्त्याने कुलकर्णी गार्डनकडे येत असताना एक तरुण त्यांच्या पाठीमागे चालत होता. कापडणीस पुढे जात असताना अचानक संशयिताने त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. अचानक झालेल्या प्रकाराने कापडणीस घाबरल्या. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर इतर नागरिकांच्या लक्षात हा प्रकार अाला. नागरिकांनी संशयिताचा पाठलाग सुरू ठेवला. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी गस्त घालत असताना त्यांच्या लक्षात हा प्रकार अाला. त्यानंतर तेही संशयिताच्या मागे धावले थोड्या अंतरावर त्यास पकडले. चौकशीमध्ये सुलतान शेख रमजान (२३, रा. भारतनगर, वडाळा) असे त्याने नाव सांगितले. त्याची झडती घेतली असता त्यात त्याने चोरी केलेले मंगळसूत्र मिळाले. ते कापडणीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. पोलिसांनी आणि नागरिकांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे माझे सौभाग्याचे लेणे मिळाले, असे सांगून त्यांनी अश्रूंना वाट माेकळी करून दिली पाेलिसांचे अाभार मानले.
पोलिसांची सतर्कता
पोलिसांनीआणि नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळेच मला चाेरट्याने चाेरलेले माझे मंगळसूत्र परत मिळाले अाहे.
- शोभा कापडणीस
नागरिकांची मदत
चोरट्यासप्रत्यक्ष पकडणे नागरिकांच्या मदतीने शक्य झाले. गस्त वाढवली असून, सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघड हाेण्याची शक्यता आहे.
- हेमंतसोमवंशी, वरिष्ठ निरीक्षक
नाकेबंदीमुळे जेरबंद
सोनसाखळीचोरी करून जाणाऱ्या संशयितास पकडण्यात अाल्याची ही शहरातील पहिलीच घटना अाहे. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या अादेशाने नाकेबंदी केल्यानेच हे शक्य झाले असल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले.