आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनसाखळी चोरांचे त्रिकूट जेरबंद, १२ तोळे सोने हस्तगत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात सोनसाखळी चोरीच्या वाढते गुन्हे रोखण्यास पोलिस यंत्रणेला अपयश येत असताना गुन्हे शाखा युनिट च्या पथकाला सोनसाखळी चोरी करणारे त्रिकूट जेरबंद करण्यास यश आले आहे. संशयितांकडून चोरीचे तब्बल १२ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २) पाथर्डी फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून सोनसाखळी चोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढत आहे. रोज किमान एक सोनसाखळी चोरीचे गुन्हा घडत अाहे. सोनसाखळी चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याने या टोळीच्या मागावर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकासह गुन्हे शाखेचे शोध पथके आहेत. मात्र, टोळीला पकडण्यास पोलिसांना अपयश येत होते. काही दिवसांपूर्वीच उपनगर परिसरात दुचाकीवरील दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते. याअाधारे गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात विशेष शोधमोहीम राबवत असताना पाथर्डी फाटा परिसरात स्प्लेंडर दुचाकीहून तीन संशयित भरधाव जाताना दिसले. पथकाने पाठलाग करून महामार्गावरील एका हॉटेलच्या समोर संशयितांना ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये तुटलेली सोनसाखळी अाढळून आली. किशोर धोत्रे, बाळू जाधव विनोद पवार (तिघे रा. शांतीनगर, अंबड) असे या तिघांनी अापली नावे सांगितली.

आणखी गुन्हे उघडकीस येणार
^पकडलेल्या त्रिकूटाकडून सोनसाखळी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत. दहा तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार असून, शहरात विविध ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस कोठडीत आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताआहे. - सुभाषचंद्र देशमुख, वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट
बातम्या आणखी आहेत...