आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chak Shikshanachi Activities For Student In Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाकं शिक्षणाची, पर्वणी आकाश दर्शनाची...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्राथमिक शिक्षण हा मुलांचा हक्क आहे. हे ओळखून त्यांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्यासाठी ‘चाकं शिक्षणाची’ या उपक्रमांतर्गत आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात गौतमनगर वस्तीतील मुलांसाठी तारांगणात आकाशदर्शन घडवण्यात आले.
‘चाकं शिक्षणाची’ या उपक्रमांतर्गत जी मुले शहरात असतांनाही शिक्षणापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून विविध शैक्षणिक उपक्रम घेतले जातात. असाच आकाश दर्शनाचा उपक्रम तारांगण येथे घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी अवकाश, अवकाश संशोधन, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो या संदर्भात माहिती दिली. यानंतर चाकं शिक्षणाची या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांतर्गत ७८० शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले गेले आहे. या मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी, तसेच ती टिकून रहावी यासाठी खेळघर, व्याख्याने, सपोर्ट क्लास घेतले जातात. गौतमनगर वस्तीतील १२० विद्यार्थी संस्थेने दत्तक घेतली आहेत. ज्यांना या कार्यक्रमाअंतर्गत शाळेत येण्या-जाण्याची सोय केली आहे. या कार्यक्रमासाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे, उपमहापौर गुरमित बग्गा, संस्थेचे संस्थापक सचिन जोशी, समन्वयक हेमंत भामरे उपस्थित होते. आर्किटेक्ट मिलिंद तारे यांच्या जन्मदिनी तारांगणचा हा शो घेण्यात आला.

मुलांना शिक्षणाची गोडी लागावी हाच उद्देश...
^या आणि यांसारख्या सगळ्याच उपक्रमांद्वारे संस्थेचा एकच उद्देश आहे की, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि ती टिकून रहावी. मुलांना तारांगणमधून अवकाशाची माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. ही मुलं शिक्षण प्रवाहातच नसल्याने त्यांना या प्रकारच्या उपक्रमांपासून वंचित रहावे लागत होते. आता या मुलांच्या शिक्षणात संस्थेचा हातभार कायम रहाणार आहे. -सचिन जोशी, संस्थापक