आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाळीसगाव जवळ अपघातात; 5 ठार 35 जण जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - लग्न लावून घराकडे परतणारा ट्रक धरणाच्या 25 फूट उंच भींतीवरून बाजूच्या शेतात कोसळल्याने पाच ठार जण जागीच ठार तर 35 व-हाडी जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली.
अपघातातील तीन गंभीर जखमींना धुळे येथे उपचारार्थ हलविण्यात आले. तर अन्य जखमींवर चाळीसगावातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. मृतांमध्ये तंगा बंन्सी चव्हाण ( 60), रामदास परमा चव्हाण (60), ज्ञानेश्वर हरी राठोड (30), प्रियंका प्रताप पवार (16), जनाबाई अर्जुन पवार (30) यांचा समावेश आहे. पाचही मयत ओढरे गावातील आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी सहावाजेच्या सुमारास चाळीसगाव ते पाटणादेवी रस्त्यावरील ओढरे धरणाजवळ घडली.
लग्न लागल्यानंतर व-हाडाचा ट्रक ओढरे गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाला होता. रस्त्यावरील ओढरे धरणाची उंच भींतवर कच्चा व अरूंद रस्ता आहे. अचानक हा ट्रक शेताकडील बाजूने कोसळला. या अपघातानंतर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलिस घटनास्थळी पोहचून मदतकार्य करून याबाबत गुन्हा नोंदवला आहे.