आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तलीसाठी गाय घेऊन जाणारी पिकअप पेटविली, चौघांविरोधात गुन्हा दाखल, दीड लाखाचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदवड (नाशिक) -  चांदवड तालुक्यातील विटावे येथून मनमाड येथे कत्तलीसाठी पिकअपमधून गाय घेऊन जाणाऱ्या चौघांविरुद्ध चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेतील पिकअप अज्ञात इसमाने पेटवून दिल्याने तिचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. विटावे येथून हारुण शेख (मनमाड), सुदाम वाघ (भडाणे), विश्वनाथ गायकवाड लक्ष्मण राघो गुंजाळ (रा. विटावे) हे शनिवारी रात्री एक गाय पिकअपमधून (एमएच १७ एजी २०००) कत्तलीसाठी घेऊन जात हाेते. याबाबत विटावे येथील पोलिसपाटील रमाकांत फकिरराव ठाकरे यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गाय घेऊन जाणाऱ्यांवर पाेलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यात अाला. यानंतर प्रकारानंतर विटावे-निंबाळेरोडजवळ ही पिकअप अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने दीड लाखाचे नुकसान झाले. 
चांदवडमधील विटावे येथून कत्तलीसाठी गाय घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला अज्ञातांनी पेटवून दिल्याने झालेले नुकसान. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...