आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगले खून प्रकरण; संशयित निर्दोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सराईत गुन्हेगार मोहन चांगले दीपक सोनवणे यांच्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित अ‍ॅड. राजेंद्र ऊर्फ दादा वाघ यांच्यासह पाचही जणांची सत्र न्यायालयाने बुधवारी सबळ पुरावा, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा अभाव आणि फिर्यादीच्या जबाबातील विसंगतीच्या आधारे निर्दोष मुक्तता केली. निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये हाणामार्‍या होण्याच्या शक्यतेने न्यायालय आवारात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आनंदवली शिवारात हॉटेल विसावा येथे मे २०१३ रोजी ही घटना घडली होती. मोहनचा भाऊ रामदास चांगले याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत तत्कालीन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांचे बंधू अ‍ॅड.राजेंद्र वाघ यांनी हत्येचा कट रचल्याची तक्रार दिली होती. गंगापूर पोलिस ठाण्यात वाघसह व्यंकटेश मोरे, अर्जुन पगारे, गिरीश शेट्टी, राकेश कोष्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन आयुक्त सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासांतच वाघ, पगारे यांना अटक झाली होती. अ‍ॅड. वाघ यांना महिन्याभराच्या आत जामीन मंजूर झाला होता. उर्वरित चारही संशयितांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करून जामीन नामंजूर झाला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिरसाळे यांच्यासमोर नियमित सुनावणी पूर्ण झाली. वाघ यांच्यातर्फे अच्युतराव अत्रे, अ‍ॅड. उमेश वालझाडे यांनी, तर उर्वरित दोघांसाठी अ‍ॅड. एम. वाय. काळे यांनी काम पाहिले.

२४ साक्षीदारांमधील १८ जणांनी फिरवला जबाब
खटल्यातसरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या २४ साक्षीदारांमधील १८ जणांनी जबाब फिरवल्याने त्यांना ‘फितूर’ ठरविण्यात आले. उर्वरित सहा साक्षीदारांमध्ये हॉटेलचा मॅनेजर त्याच्या पत्नीची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. त्यांच्या जबाबानुसार, घटनास्थळी चांगले सोनवणे दोघेच रात्री जेवणासाठी आले होते. त्याच वेळी अज्ञात पाच जणांच्या टोळक्याने येऊन त्यांच्यावर हल्ला केला, त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर मॅनेजरच्या एका नातलगाने मोहनला ओळखून त्यानेच रामदासला फोनवर ही माहिती दिली. त्यानंतर तो घटनास्थळी दाखल झाला. हीच साक्ष आरोपींच्या वकिलांनी उलट तपासणीत ग्राह्य धरण्याची मागणी केली. तर, फिर्यादी रामदास चांगले याने सुरुवातीला दादा वाघ यानेच कट रचून उर्वरित टोळीला बोलावून चांगले यास टोळीत सहभागी होत नसल्याच्या कारणावरून त्याच्यावर हल्ला केल्याचा जबाब दिला.

महिन्याभरानंतर पोलिस तपासात दुसरा जबाब नोंदवून त्यात आपण स्वत: घटनास्थळी उपस्थित होतो, टोळक्यानेहल्ला करताच बाथरूममध्ये लपून राहिलो बाहेर पडल्यावर जखमी सोनवणे याने मला वाघ त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याचे त्याने सांगितले होते. या सर्व साक्षी, फिर्यादीत विसंगती आढळून येत असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. अत्रे यांनी न्यायालयासमोर केला. तसेच, फिर्यादी चांगले याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचेही सांगण्यात आले. याच मुद्यावरून पाचही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.