आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Changale Sonawane Murder Case: Political Middle Man Arjun Pagare Surnder

चांगले-सोनवणे खून प्रकरण: राजकीय मध्यस्थीतून अर्जुन पगारे पोलिसांना शरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मोहन चांगले व दीपक सोनवणे खून प्रकरणातील फरार संशयित अर्जुन पगारे सोमवारी पंचवटी पोलिस ठाण्यात काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने शरण आला. या प्रकरणातील आणखी दोघे अद्यापही फरार असून त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

गंगापूररोडवरील हॉटेल विसावा येथे चांगले व सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी महापौर यतीन वाघ यांचे मोठे बंधू अँड. राजेंद्र ऊर्फ दादा वाघ आणि व्यंकटेश मोरे यांना अटक केली होती. या घटनेस तब्बल महिनाभराचा कालावधी उलटूनही मुख्य संशयित पगारे, राकेश कोष्टी, गिरीश गिरी या संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. सोमवारी पगारे हा कुटुंबीयांसमवेत पंचवटी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यास गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

वाघ यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मोरेची रवानगी नाशिकरोड कारागृहात झाली आली आहे. एक महिन्याच्या कालावधीत कोष्टी व गिरी यांच्यापर्यंत पोलिस का पोहचू शकले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पगारेला राजकीय नेते व पोलिसांनी शरण येणे भाग पाडले असेल तर या दोघांना का नाही, असाही सवाल करण्यात येत आहे.

पंचवटीत यापूर्वीही भद्रकाली व सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणातील संशयित शरण आले होते. पगारेही तेथेच शरण आला.

खुनाचे रहस्य उलगडणार? मुख्य संशयित पोलिसांना शरण आल्यानंतर या हत्याकांडामागील खरे कारण समोर येणार असल्याची चर्चा आहे. कोष्टी व गिरी यांना अटक केल्यानंतरच या प्रकरणावर संपूर्ण प्रकाश पडेल, असे काही पोलिस अधिकार्‍यांनी खासगीत सांगितले.

85 हजाराची चोरी
मोबाईलच्या दुकानाची भिंत फोडून 60 हजाराचे मोबाईल आणि 15 हजार रोख रक्कमेची चोरी करण्यात आली. अशोकस्तंभावर हा प्रकार घडला. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोकस्तंभ येथील घर नंबर 480 मध्ये असलेल्या बी. बी. मोबाईल या दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून ही चोरी केली. सकाळी दहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक एस. एल. कुंभारे तपास करत आहे.

सहमती शिवाय गर्भपात, पती-सासरच्यांवर गुन्हा
पत्नीच्या सहमतीशिवाय गर्भपात करून दोन लाखांचे दागिने काढून घेत माहेरून दोन लाख रूपये घेऊन यावे याकरीता विवाहीतेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.भद्रकाली परिसरातील र्शध्दा अतुल विसे (रा. शिवनेरी व्हीडीओ हॉल) या विवाहितेच्या तक्रारीवरून पती अतूल विसे, सासु आशा, नणंद मनिषा बहिरम, र्शावणी दळवी यांनी सहमती शिवाय दोन वेळा गर्भपात केला, असेही तक्रारीत म्हटले आहे.