आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी अभय याेजनेत अवघ्या १४ दिवसांत बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एलबीटी अभय याेजनेची जून राेजी अधिसूचना काढल्यानंतर अवघ्या १४ दिवसांत शासनाला त्यातील तरतुदींत बदल करावा लागला अाहे. १७ जून राेजी शासनाने नवी अधिसूचना काढली असून, झालेल्या बदलांनुसार अाता या याेजनेनुसार प्राप्त हाेणाऱ्या विवरणपत्रांची शंभर टक्के निर्धारणा करणे अावश्यक असेल. या याेजनेखाली प्राप्त हाेणाऱ्या विवरणपत्रांची पडताळणी ३१ मार्च २०१६ पूर्वी पूर्ण करणे अावश्यक राहणार अाहे. यापूर्वी हीच मुदत ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत हाेती. विशेष म्हणजे याेजनेचा लाभ पूर्वीप्रमाणेच ३१ जुलै २०१५ पर्यंतच व्यावसायिकांना घेता येणार अाहे.

एलबीटी राज्यातून हद्दपार करण्याची घाेेषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता अाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अाॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घाेेषणा केली हाेती. त्यानंतर एलबीटीच्या अनुषंगाने व्यावसायिकांकरिता अभय याेजना राबविण्याची मागणी हाेत असल्याने शासनाने दंड व्याजात सवलत देणारी अशा याेजनेची अधिसूचना जून २०१५ राेजी काढली हाेती. मात्र, यात अवघ्या १४ दिवसांतच शासनाला बदल करावे लागले अाहेत. या याेजनेस वेगवान प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, पहिल्या दहा दिवसांत राज्यभरातून अल्प प्रतिसाद मिळाल्याने महापालिकांनी उत्पन्न बुडत असल्याने केलेली अाेरड हे या बदलामागील मुख्य कारण असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिकमध्ये झाली ४० लाखांची वसुली
नाशिकमहापालिकेने विवरणपत्र सादर करणाऱ्या व्यावसायिकांची बँक खाती गाेठविली हाेती. त्यामुळे व्यावसायिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांनी दंडाची रक्कम भरून खाती उघडून घेतली अाहेत. या कारवाईत जवळपास ४० लाख रुपये महापालिकेला मिळाले अाहेत.

महापालिकेला घ्यावी लागणार कार्यशाळा
याेजनालागू झाल्यानंतर तिची माहिती व्यावसायिकांपर्यंत पाेहाेचावी, या अनुषंगाने महापालिकांनी कार्यशाळा अायाेजित करण्याचे अधिसूचनेत स्पष्ट केले अाहे. राज्यातील विविध महापालिकांकडून अशा कार्यशाळा झाल्या असल्या, तरी नाशिक महापालिकेने अशी कार्यशाळा अद्याप घेतलेली नाही. याबाबत उपायुक्त हरिभाऊ फडाेळ यांनी विचारणा केली असता याच महिन्यात अशा प्रकारची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...