आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्नदान केंद्राची जागा बदला; भिकाऱ्यांची संख्या आपोआप घटेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंचवटी परिसरातील अन्नदान केंद्र बंद केल्यास भिकाऱ्यांची संख्या आपोआप कमी होण्यास मदत होईल, यासाठी अन्नदान केंद्र बंद करावे, अशी मागणी सिंहस्थ समन्वय समितीने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

अन्नदानाच्या कार्यक्रमांत भिकाऱ्यांना मुबलक अन्न दिले जात असले तरीही त्यातील बहुतांश अन्न वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रामकुंड परिसरातील अन्नदान केंद्राची जागा बदला अथवा कुंभमेळ्यात येथील अन्नदान बंद ठेवा, अशी सूचनाही समितीने केली आहे.
गंगेवर मोफत खायचे आणि गोदाघाटावर उघड्या जागेवर झोपायचे हा येथील भिकाऱ्यांचा नित्यक्रम वर्षानुवर्षे सुरू आहे. शहरातील काही मोठे व्यावसायिक पुण्य कमावण्याच्या हेतूने सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून रोज अन्नदान करतात. मात्र, त्यातून स्वत: पुण्य कमावण्याच्या मोहापायी शहरवासीयांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ केला जात आहे. बहुतांश भिकाऱ्यांना असाध्य रोग जडलेले आहेत. रांगेत उभे करून त्यांना हवे तेवढे अन्न वाटप केले जाते. मात्र, प्रारंभी घेतलेले अधिक अन्न भिकारी पोट भरल्यानंतर रस्त्यावर फेकून देतात.
अन्नाची नासाडी होते. भिकाऱ्यांना एकाच छताखाली अन्न आणि निवाऱ्याची सुविधा दिल्यास रामकुंडावरील प्रदूषण घाण बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत सिंहस्थ कुंभमेळा समन्वय समितीने व्यक्त केले आहे.
या ठिकाणी अन्नदान
रामकुंड,कपालेश्वर मंदिर परिसर, शनिचौक, गोदाघाट, धर्मशाळा, तपोवन अादी परिसरात अन्नदान केले जाते.
असे नियोजन सहज शक्य
प्रशासनाने अन्नदान केंद्र निवास एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यास फरक पडेल. मदत लागल्यास समिती तयार आहे.
देवांगजानी, समन्वयक, कुंभमे‌ळा समिती
बातम्या आणखी आहेत...