आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन तहसीलदारासह सात जणांवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माहिती अधिकारात तत्कालीन तहसीलदारासह कोतवाल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पालिका अभियंता यांच्यासह सात जणांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीसाठी उपोषणाचा इशारा देणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार सोमवारी (दि. २६) त्र्यंबकेश्वर येथे घडला. याप्रकरणी त्र्यंबकेश्वरच्या तत्कालीन तहसीलदारासह सात अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबरी लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि राज्य माहिती अधिकार केंद्राचे तालुकाध्यक्ष सुधाकर गंगापुत्र (रा. पाचआळी, त्र्यंबकेश्वर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संशयित तत्कालीन तहसीलदार बहिरम, त्यांचा वाहनचालक कारभारी वाघ, सापगावचे कोतवाल शंकर वाघेरे, नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, न.पा. अभियंता जुन्नरे आणि भागीदार प्रमोद देवकुटे यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी(दि. २६) नाशिकच्या पाथर्डी फाटा येथे कार्यकर्त्यांसह उपोषणाचा इशारा गंगापुत्र यांनी दिला होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास गंगापुत्र यांची इनोव्हा कार (एमएच १५, सीडी ३२) एका लॉजसमोर उभी असताना गाडीच्या डिकीत ठेवलेल्या बॅगेतून चार ते पाच संशयित माहिती अधिकारात मिळवलेले कागदपत्र आणि पेन ड्राइव्ह काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडले. झटापट सुरू असताना संशयितांनी लाकडी दांडक्याने पायावर मारहाण केली. खाली पडल्यानंतर एकाने धारधार शस्त्राने पाठीवर वार केला. बॅगमध्ये ठेवलेले सर्व पुराव्यांचे कागदपत्र घेऊन पसार झाले. झटापटीमध्ये गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाल्याचे गंगापुत्र यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात मारहाण, जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक मुकुंद देशमुख अधिक तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...