आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मादाय अायुक्तांसह २४ पदे रिक्त, तब्बल ३३०० प्रकरणे प्रलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकच्या सार्वजनिक न्यास नाेंदणी कार्यालयात अाजघडीला एकूण २४ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब ‘डी. बी. स्टार’ने केेलेल्या पाहणीत समाेर अाली अाहे. त्यात धर्मादाय सहअायुक्त, सहायक धर्मादाय अायुक्त, प्रशासकीय अधिकारी, सिस्टिम अॅडमिन, अधीक्षक, लेखापाल, निरीक्षक, न्याय लिपिक, लघुलेखक अाणि वरिष्ठ लिपिक अशा अत्यंत महत्त्वाच्या पदांसह अन्य काही चतुर्थ श्रेणीतील पदे रिक्त अाहेत. त्यात कार्यालयीन प्रमुख असलेले धर्मादाय सहअायुक्त पदावरील डी. बी. महाले हे जुलैअखेरीस निवृत्त झाले. तेव्हापासून हे पददेखील रिक्त असून, या सर्व रिक्त पदांमुळे कार्यालयातील कामकाजांचा, सुनावणींचा बाेजवाराच उडाला असल्याचे ‘डी. बी. स्टार’ने िदलेल्या भेटीत िदसून अाले. महत्त्वाची बाब म्हणजे, नाशिकसह अन्य काही िवभागांतदेखील हेच िचत्र असून, माेठ्या प्रमाणावर महत्त्वाची पदे रिक्त असतानाही संबंधित विधी अाणि न्याय मंत्रालयाला साेयरसूतक नसल्याचे चित्र अाहे.

सहा महिन्यांपूर्वी निकाल
सार्वजनिक न्यास नाेंदणी कार्यालयातील रिक्त पदांसाठी झालेल्या परीक्षांचा निकाल लागून सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला. मात्र, त्यानंतरही पुढील प्रक्रिया पार पडली नसल्याने त्याचा फटका कार्यालयीन कामकाजाला बसत अाहे. िवशेष म्हणजे, असे असतानादेखील संबंधित विधी अाणि न्याय मंत्रालयाकडून अद्यापही याबाबत काेणतीच दखल घेतली गेलेली नसल्याने हा प्रश्न सुटण्याबाबत चिन्हे नाहीत.
प्रभारींकडे साेपविला पदभार
नाशिक विभागाला धर्मादाय सहअायुक्तपद रिक्त झाल्यापासून पुण्याच्या धर्मादाय सहअायुक्तांकडे अतिरिक्त पदभार साेपविण्यात अाला अाहे. मात्र, कार्यबाहुल्यामुळे पदभार स्वीकारल्यापासून त्यांना नाशिकला एकदाच धावती भेट देणे शक्य झाले असल्याची माहिती ‘डी. बी. स्टार’ला िमळाली. नाशिकच्या कर्मचाऱ्यांनी गत सप्ताहातच त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अांदाेलन करून भविष्यात ‘पेन बंद’ अांदाेलनाचा इशारादेखील दिला असल्याने या संपूर्ण प्रकरणात अाता तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली अाहे.

अपील करायचे कुठे?
कनिष्ठन्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध कुणाला अपील करायचे असल्यास वरिष्ठ न्यायालयाकडे करावे लागते. मात्र, कार्यालयातील सर्वाेच्च पदापासून अनेक प्रमुख पदे रिक्त असल्याने सर्व अपील ठप्प झाली अाहेत. विश्वस्तांविरुद्धची निलंबित प्रकरणे, विश्वस्त कार्यकारिणी, खरेदी-विक्री परवानग्या अादी बाबीदेखील ठप्प झाल्या अाहेत.

िरक्त पदांमुळे नागरिकांची बाेळवण
काेणतीही सामाजिक संस्था सुरू करायची असेल तर त्यासाठी त्याची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करावी लागते. मंदिर, मठ, गणेश मंडळ आदी संस्थांसाठी ट्रस्ट स्थापन करावा लागतो. त्यानंतर धर्मादाय कार्यालयात त्याची रीतसर नोंद करून घ्यावी लागते. याशिवाय, संस्थांची नोंदणी, चेंज रिपोर्ट सादर करणे, ऑडिट दाखल करणे आदी सर्व कामेही कार्यालयामार्फत हाेतात. याकामी कार्यालयात अनेकांच्या फेऱ्या सुरू असतात. त्यात अनेक नागरिकांना जिल्हाभरातून वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने त्यांचा वेळ अाणि पैशाचा विनाकारण अपव्यय हाेत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. कामकाजाला हाेत असलेल्या विलंबामुळे सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हताेत्साहित होत असल्याचेही दिसून अाले.

२४ नाशिक
१७ जळगाव
१३ धुळे
१० नंदुरबार

सर्वाधिक रिक्त पदे नाशिकला...
नाशिकच्या या कार्यालयासाठी मंजूर असलेली तब्बल २४ पदे रिक्त अाहेत. अन्य विभागांतही माेठ्या प्रमाणावर महत्त्वाची पदे रिक्तच असल्याची अाकडेवारी अाहे. विशेष म्हणजे, या सर्व पदांना शासनाने मंजुरी दिली असूनही या पदभरतीला मुहूर्त लागत नसल्याने सर्वच कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झाला अाहे.

पदांची अाकडेवारी...
पदांच्या रिक्ततेबाबत प्रभारी सहअायुक्तच अनभिज्ञ; सर्वसामान्यांची बाेळवण थांबणार तरी कधी...?
सार्वजनिक न्यास नाेंदणी कार्यालयातील धर्मादाय सहअायुक्त पदासह १५ कार्यालयीन महत्त्वाची पदे, तसेच चतुर्थ श्रेणीची पदे रिक्त असल्याने विविध प्रकरणे प्रलंबित राहात अाहेत. या पार्श्वभूमीवर ‘डी. बी. स्टार’ने पाहणी केली असता, सद्यस्थितीत नाशिक महानगर अाणि जिल्ह्यातील मिळून तब्बल ३३०० प्रकरणे प्रलंबित राहिलेली असून, सुनावणींचा खेळखंडाेबा सुरूच असल्याने नाेंदणीकामी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मात्र बाेळवण कायम अाहे. विशेष म्हणजे, प्रभारी धर्मादाय सहअायुक्तांना गत सहा महिन्यांत नाशिकला एकदाच ‘धावती भेट’ देणे शक्य झाले असल्याने सार्वजनिक न्यास नाेंदणी कार्यालयातील विलंबाच्या प्रक्रियेत भर पडली अाहे. प्रभारी धर्मादाय सहअायुक्तांना याबाबत विचारणा केली असता त्यांनाच पदे रिक्ततेबाबतची माहिती नसल्याने समस्या अाहे, हीच माहिती वरिष्ठांपर्यंत पाेहाेचली नसल्याचे निष्पन्न हाेत अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
{नाशिक विभागातधर्मादाय आयुक्तालयामधील अनेक पदे अाजही रिक्त अाहेत. याबाबत माहिती आहे का?
नाशिकविभागातील रिक्त पदांबाबतची माहिती संबंधितांकडून घ्यावी लागेल.
{रिक्त पदांमुळेधर्मादाय आयुक्तालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याचे काय?
रिक्तपदांबाबतची माहिती नसल्यामुळे अाताच प्रकरणांबाबत सांगता येणार नाही. याबाबत संबंधितांकडून लगेचच माहिती घेतो.