नाशिक : नाशकातील घाऊक अाैषध विक्रेत्या संघटनेवर तब्बल २० वर्षांहून अधिक काळ एकहाती सत्ता गाजवणाऱ्या गाेरख चाैधरी यांची चाैधरी अॅंड कंपनी अाणि करवा फार्मा यांनी जादा नफा कमविण्यासाठी अाैषध कंपन्यांच्या अधिकृत प्रतिनिधींशी (एमअार) संगमनत करून कंपनीसह शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे.
या प्रकरणी अन्न अाैषध प्रशासनाच्या मुंबईतील दक्षता विभागाने केलेल्या कारवाईनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने या दाेन्ही विक्रेत्यांना तत्काळ अाैषधे खरेदी-विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचे अादेश दिले. या दाेघांसह त्यांना साथ देणाऱ्या पाच एमअार विराेधात सरकारवाडा पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
अन्न अाैषध प्रशासन विभागाचे सहायक अायुक्त भूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाेळे काॅलनीतील करवा फार्मास्यूटिकल्सचे अमर करवा चाैधरी अॅंड कंपनी, संजीवनी संकुल यांनी सिप्ला कंपनीकडे माेठ्या प्रमाणात अाैषधांची मागणी नाेंदवली.
कंपनीच्याच काही एमअारना हाताशी धरून दाेघांच्या व्यवसायाच्या ठिकाणी बनावट शिक्के, पावत्या तयार करून हाॅस्पिटलसाठी विशेष सूटच्या दरात अाैषधे खरेदी केली. मात्र, या अाैषधांची विक्री बनावट बिलांद्वारे अाणि बनावट विक्रेत्यांना केल्याची माहिती विभागाला प्राप्त झाली हाेती. त्यानुसार दक्षता विभागाने छापा टाकून या प्रकरणाची सखाेल चाैकशी केली असता चाैधरी करवा यांनी लाखाे रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास अाले.
या संपूर्ण प्रकरणात दाेन्ही विक्रेत्यांनी कंपनीबराेबरच शासनाची फसवणूक केल्याचे अाणि अाैषधे साैंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले अाहे. या प्रकाराने शहर जिल्ह्यातील घाऊक किरकाेळ अाैषधे विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून बाेगस नाेंदणी करणाऱ्यांचीही चाैकशी हाेणार असल्याने खळबळ उडाली अाहे.
स्थानिक एफडीएची भूमिका संशयास्पद
तत्कालीन अायुक्त महेश झगडे यांच्या कार्यकाळात नाशिकच नव्हे, तर राज्यभरातील नियमबाह्य अाैषधे विक्री करणाऱ्यांना दणका देत नियमानुसार काम सुरू झाले हाेते. त्यांनी स्थानिक एफडीएच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे अादेश दिल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांचेही धाबे दणाणले हाेते. त्या काळात किरकाेळ कारवाई झाली तरी स्थानिक प्रशासनाकडून पत्रकार परिषद अथवा माहिती प्रसारमाध्यमांना कळविली जात हाेती.
यामागे केवळ ग्राहकांची जनजागृती हाच उद्देश असताना दक्षता विभागाने थेट दाेन बड्या घाऊक अाैषधे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांची विक्री कायमची बंद करण्याची धडाकेबाज कारवाई करूनही स्थानिक अधिकाऱ्यांनी माैन बाळगल्याने संशय निर्माण हाेत अाहे. यापूर्वीही अनेक कारवाया मुंबई कार्यालयातूनच झाल्याने स्थानिक अधिकारी, निरीक्षकांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत अाहे.
‘चाैधरी-करवा’सह पाच एमअारवर गुन्हा
- करवा फार्मास्यूटिकल्सचे अमर अशाेक करवा, भागीदार अजित ब्रिजलाल करवा, अशाेक ब्रिजलाल करवा, गाेरख सदाशिव चाैधरी, त्यांचे भागीदार विद्या गाेरख चाैधरी, वीरेन गाेरख चाैधरी या सहा जणांसह अाकाश पाटील, स्वप्नील बाेरसे, गणेश मंडलिक, ईश्वर क्षीरसागर, दिनकर व्हडगर या सिप्ला कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींविराेधात सरकारवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
- भूषण पाटील, सहायक अायुक्त, एफडीए