आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर घाण पडल्याचे सांगून वृद्धास साडेसहा लाखांना गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दोन बँकांमधून रक्कम काढणाऱ्या एका कंपनीतील वृद्ध कर्मचाऱ्याला अंगावर घाण पडली आणि पैसे पडल्याचे सांगून त्यांची साडेसहा लाख रुपयांची रक्कम लांबवण्याचा प्रकार शनिवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अशोक परसराम आहिरे यांच्या फिर्यादीनुसार गिरणा इन्फ्रा. प्रायव्हेट लि. या बांधकाम कंपनीच्या कामासाठी भद्रकाली परिसरातील एका बँकेतून साडेचार लाख स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून दीड लाखाची रक्कम काढून कारकडे जात असताना एका संशयिताने अंगावर घाण पडल्याचे सांगितले. त्याकडे दुर्लक्ष करत ते निघाले असता कारजवळ आल्यानंतर दुसऱ्या संशयिताने पैसे पडल्याचे सांगितले. घाईत रकमेची बॅग कारच्या बोनटवर ठेवून ते खाली पाहत असताना दोघांनी ही बॅग घेऊन पोबारा केला.

पाळत ठेवून चोरी
संशयितांनी पाळत ठेवून हा प्रकार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. बँकेच्या बाहेर वृद्धांना लक्ष्य करत रक्कम लांबवण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात येतो. मात्र, नागरिकांकडून या सुविधेचा लाभ घेतला जात नाही.