नाशिक - देवळाली येथील साडेसहा हजार चौरस मीटर जागा व्यवहाराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच गायक सुरेश वाडकर यांच्यासह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिक रोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी दिले आहेत. यासंदर्भात ‘सीए’ मुकुंद कोकीळ यांनी वाडकर यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती.
कोकीळ यांनी हा कोट्यवधींचा प्लॉट खरेदी केला होता. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही वाडकर यांनी परस्पर प्लॉट खरेदीची बनावट कागदपत्रे तयार करून घेतली. या दस्तऐवजाचा गैरवापर करून ते खरे असल्याचे दाखवत कोकीळ यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोकीळ यांनी सुरुवातीला उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.