आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंदूकधारी गार्डकडून नगरसेवकांची झडती; स्थायी सभापतींच्या अादेशाला केराची टाेपली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा अामदार बच्चू कडू यांच्यासाेबतच्या वादानंतर महापालिकेत खासगीकरणातून बंदूकधारी सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करताना केवळ एकच बंदूकधारी ताेही अायुक्तांच्या सुरक्षेसाठी असेल, असा ठराव केला हाेता. प्रत्यक्षात त्यास केराची टाेपली दाखवत मुख्य प्रवेशद्वारावरच बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात केल्यामुळे नगरसेवकांसह नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटला. दरम्यान, या सुरक्षारक्षकांनी मनसे गटनेते सलीम शेख, माजी उपमहापाैर गुरुमित बग्गा यांना अडवून तपासणी केली तर मागील प्रवेशद्वारावरून नगरसेवक म्हणून प्रवेश करू इच्छिणाऱ्या काँग्रेस गटनेते शाहू खैरे यांनाही मुख्य प्रवेशद्वाराकडे पाठविण्यात अाले. 


सर्वसामान्य नाशिककरांचा राेजचा संबंध असलेल्या नाशिक महापालिकेत स्वत:चे सुरक्षारक्षक अाधीच तैनात अाहेत. त्यांच्यामार्फत येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून तपासणीही हाेते. मात्र, काही महिन्यांपूर्वी अामदार कडू यांनी थेट अायुक्तांवर हात उचलण्याचा प्रयत्न केल्यानंतर खासगीकरणातून ठेकेदाराचे कर्मचारी नियुक्तीस उत्सुक प्रशासनाने बंदूकधारी सुरक्षारक्षक नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला. अायुक्तांचा प्रस्ताव असल्यामुळे प्रारंभीच स्थायी समितीने विराेध केला, मात्र ४५ सुरक्षारक्षकांपैकी केवळ एकच सुरक्षारक्षक बंदूकधारी असेल ताेही अायुक्तांच्या सेवेत तैनात असेल अशी अट टाकून प्रस्तावाला मंजुरी दिली. दरम्यान, हे सुरक्षारक्षक साेमवारपासून महापालिका मुख्यालयात दाखल झाले. पाेलिस दलातील कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांच्याकडे प्लास्टिकच्या लाठ्या देण्यात अाल्या अाहेत. 


मुख्य प्रवेशद्वारावर एक बंदूकधारी तर एक अायुक्त दालनाजवळ तैनात करण्यात अाला अाहे. याखेरीज बाकीचे प्रवेशद्वार बंद करून मुख्य प्रवेशद्वारावरून सर्वांना प्रवेश दिला जात अाहे. दरम्यान, सुरक्षारक्षक नवीन असल्यामुळे त्यांची नगरसेवक वा पदाधिकाऱ्यांशी अाेळख नाही. त्यातून मनसे गटनेते शेख यांना कागदपत्रांची पिशवी तपासून अात जाण्याची वेळ अाली. अशीच परिस्थिती माजी उपमहापाैर बग्गा यांच्यासाेबतही झाली. सर्वात गंमत म्हणजे मागील प्रवेशद्वारावरून येणाऱ्या काँग्रेस गटनेते खैरे यांना पुढील प्रवेशद्वारावर पाठविण्यात अाले. त्यांनीही नियमांचे पालन करीत मुख्य प्रवेशद्वारावरून जाणे पसंत केले. दरम्यान, पहिल्या टप्प्यात २५ सुरक्षारक्षक दाखल झाले असून, अाणखी २० सुरक्षारक्षक लवकरच उपलब्ध हाेतील, असे अतिरिक्त अायुक्त किशाेर बाेर्डे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...