आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केमिस्ट असोसिएशनची पुन्हा एकदा निवडणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारिणीकरिता निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य कार्यकारिणीकडे निवडणूक कार्यक्रमांकरिता प्रस्ताव तयार करण्यात येत असून, लवकरच केमिस्ट असोसिएशनच्या जिल्ह्यातील साडेचार हजार सदस्यांना पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनमध्ये जिल्हाध्यक्षपदावरून गेल्या वर्षभरापासून वाद निर्माण झाला होता. तत्कालीन जिल्हाध्यक्ष गोरख चौधरी यांच्यावर बहुमताने अविश्वास मंजूर करून कार्यकारिणी सदस्यांनी नितीन देवरगावकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती. दरम्यान, संघटनेच्या घटनेतच अविश्वासाची तरतूद नसल्याने आपणच अध्यक्ष कायम असल्याचे गोरख चौधरी यांनी सांगत निवडणूक जाहीर केली. त्यात चौधरी यांना जिल्ह्यातील बहुतांश जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आणता आले व जिल्हाध्यक्षपदी पुन्हा विराजमानही झाले. मात्र, चौधरी यांना राज्य संघटनेची मान्यता नसून, त्यांनी घेतलेली निवडणूक लुटुपुटूची असल्याचे सांगत राज्य संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडणुका स्वतंत्रपणे होणार असल्याचे नितीन देवरगावकर यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, देवरगावकर यांनी दिलेली 18 ऑगस्ट ही निवडणुकीची तारीख उलटून गेली तरी निवडणूक झालेली नाही.