आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal Has Benami Flats In Mumbai, Kirit Somyya Alegation

मुंबईत छगन भुजबळ यांचे बेनामी फ्लॅटस, किरीट सोमय्या यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबईतील आयपीएस अधिका-यांच्या ‘वसुंधरा सोसायटी’त सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबातील सदस्यांचे दोन बेनामी फ्लॅटस् असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकारच घोटाळेबाज असून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या प्रकरणात न्यायालयाने वारंवार ताशेरे ओढूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ते म्हणाले.


वसुंधरा सोसायटीला भुजबळ यांनी भूखंड व झटपट परवानग्या मिळवून दिल्या आहेत. या मोबदल्यात स्वत:च्या पदरात 30 कोटी बाजारभाव असलेले दोन फ्लॅटस पाडून घेतले. हवालदार व सहायक पोलिस निरीक्षकपदावरील पांडुरंग पाटील व लक्ष्मण उकरंडे यांच्या नावे 30 लाखांत हे फ्लॅट त्यांनी विकत घेतले. भावेश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फ्लॅटचे पैसे दिले असून कंपनीचे मालक, संचालक स्वत: भुजबळ, त्यांचे पुत्र व पुतणे असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.