आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त घरांच्या निर्मितीकडे बिल्डर्सने लक्ष द्यावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी स्वस्त घरांच्या निर्मितीकडे बिल्डर्सने लक्ष देण्याची गरज असून, जमिनीचे दर जास्त असल्याने स्वस्त घरे देता येत नसली, तरी राज्य शासनही त्याकरिता प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केले.

डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित बिल्डमॅट टेक -2013 या प्रदर्शनाच्या समारोपावेळी भुजबळ बोलत होते. व्यासपीठावर खासदार समीर भुजबळ, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. सुदर्शन, सरचिटणीस एम. एस. सुदर्शन, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष हेमंत धात्रक, नाशिक शाखेचे अध्यक्ष विजय सानप, सचिव पुनीत रॉय, आर्किटेक्ट्स अँण्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनुप मोहबन्सी, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष किरण चव्हाण, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष विलास बिरारी, इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे अध्यक्ष नीलेश चव्हाण, अनिल कडभाने आदी उपस्थित होते. पुणे-मुंबईत जागाच उपलब्ध नसल्याने नाशिककडे लोकांचे लक्ष लागून असून, या शहरात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने आकर्षण वाढते आहे.

आगामी सिंहस्थ काळात शहर व परिसरात एक हजार कोटींच्या रस्त्यांचे काम होणार असल्याचे सांगतानाच शहर परिसरात हजारो कोटींची विविध विकासकामे होणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. दहा वर्षांपासून कोईम्बतूर येथे भरविण्यात येत असलेल्या बिल्डमॅट टेक प्रदर्शनाच्या तोडीचे प्रदर्शन पहिल्याच प्रयत्नात नाशिक शाखेने भरविल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय अध्यक्ष पी. सुदर्शन यांनी या वेळी काढले.