आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal NCP Leader, Latest News, Divya Matahi,

इकडे शक्तिप्रदर्शन.. तिकडे मनस्ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने संपूर्ण शहरातील वाहतूक विस्कळित झाली. या वाहतूक कोंडीमुळे दहावीचा पेपर देऊन घरी जाणारे विद्यार्थी आणि त्यांना घेण्यासाठी आलेल्या पालकांची तारांबळ उडाली. प्रमुख रस्त्यांवर अचानक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढल्याने पोलिसांनी काही मार्गांवर वाहतूक बंद केली. त्यामुळे सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री भुजबळ यांचे आगमन झाले. तेथून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास गेले. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणाहून ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्ते मैदानावर येत होते. मात्र, नियोजित मोटारसायकल रॅली सुरू असतानाच आणखी दोन ते तीन वेगवेगळ्या मार्गांवरून रॅली काढण्यात आल्याने पोलिसांची पळापळ झाली. अचानक निघालेल्या रॅलीमुळे सीबीएस ते शरणपूररोड, कॅनडा कॉर्नर, मुंबईनाका ते त्र्यंबकनाका तिथून सीबीएस, अशोकस्तंभ मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या मार्गांवरील बसथांबे, रिक्षाथांब्यांवर पेपर सुटलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी, त्यात वाहतुकीची कोंडी झाल्याने विद्यार्थी, पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
या मार्गावर कोंडी
शासकीय विर्शामगृहापासून गडकरी चौक, सावरकर तरण तलाव ते त्र्यंबकनाका दुतर्फा आणि जिल्हा परिषद कार्यालय ते गंजमाळ, शालिमार चौक ते सीबीएस, रविवार कारंजा या भागात वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा परिणाम इतर मार्गावर होऊन वाहतुकीचे नियोजनच कोलमडले.
वाहतूक पोलिस दिशाहीन
प्रमुख मार्गांवर निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि त्यास कारणीभूत ठरलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांना अटकाव करण्यात वाहतूक पोलिस पूर्णत: अपयशी ठरले. त्यातच बसेस, रिक्षांचे मार्ग ऐनवेळी बदलावे लागल्याने कोंडीत भरच पडत गेली. वाहतूक पोलिसांनाही योग्य त्या सूचना वरिष्ठांकडून प्राप्त होत नसल्याने त्यांच्यातील नियोजनाचा अभाव पावलोपावली निदर्शनास आला. सिग्नलही बंद करण्यात आल्याने जिल्हा व खासगी रुग्णालयात जाणार्‍या रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्या होत्या.
महापुरुषांच्या पुतळ्यांचे दर्शन
पोलिस परेड ग्राउंडवरून भुजबळ यांनी हुतात्मा स्मारकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर शिवाजीरोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ते नतमस्तक झाले. दरम्यान, भुजबळ यांनी राष्ट्रवादी भवन येथेही हजेरी लावून पदाधिकार्‍यांचा सत्कार स्वीकारला. त्यानंतर भुजबळ फार्म येथे विर्शाम करून ते ओझर विमानतळाकडे रवाना झाले.
आधी केले, मग सांगितले
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ‘करून दाखवले’ असा नारा देत लोकांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भुजबळ सर्मथकांचे ‘आधी केले, मग सांगितले’ असे फलक लक्षवेधी ठरले.
शरणपूररोडच ‘राष्ट्रवादीमय’
पोलिस परेड ग्राउंडवर भुजबळ यांचे हेलिकॉप्टरने दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास आगमन झाले. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी दुपारी 2 वाजेपासूनच शरणपूररोडचा ताबा घेतला होता. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्ते बेभान होऊथिरकत होते. उत्साही कार्यकर्त्यांना आवरता-आवरता पोलिसांची दमछाक झाली.