आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळ पडला म्हणजे नरमलेला नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - छगन भुजबळ पडला म्हणजे नरमला व आता आपण गरम झाले पाहिजे, असा समज काढून टाका. भुजबळ आजही सर्मथ असून प्रेमाने जवळ घेतो म्हणजे घाबरला, अशा भ्रमात राहू नका, अशा कानपिचक्या देत पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, माझा पराभव शिवसेना, भाजप वा अन्य कोणामुळे झाला नसून नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा तो तडाखा असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात येत्या काही दिवसांत जनमत तयार होईल व त्याचा फायदा उचलण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिक शहराध्यक्षपदी अर्जुन टिळे यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर आली होती. त्यावर मलमपट्टी करण्यासाठी भुजबळ यांनी राष्ट्रवादी भवनात आयोजित टिळे यांच्या सत्कार सोहळ्यात जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, पक्षात बेशिस्त चालणार नाही. मला कोणाचाही अपमान करायचा नाही. मात्र, माझ्याशिवाय पार्टी चालणारच नाही, हा समज कोणाच्या मनात असेल तर तो काढून टाका.

पदासाठी इच्छा प्रदर्शित करणे वाईट नाही, पण ज्यांनी नाराजी सोडली नाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या प्रभागातून पक्षाला किती मते पडली याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. 1999 मध्ये कॉँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यावर राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्या वेळी शिवसेना-भाजपने सहा महिने बाकी असतानाच फुटीचा फायदा उचलण्यासाठी निवडणुकांचा फड मांडला. मात्र, त्यात त्यांचाच पराजय झाला. त्यामुळे राजकारणात प्रत्येक गोष्ट मागे-पुढे होत असते हे जाणून घ्यावे, असेही ते म्हणाले.