आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांना स्वकीयांनीच पाडले - बापू भुजबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हमे तो अपनो ने लुटा, गैरों मे कहा दम था.. अशी शेरेबाजी करीत राष्ट्रवादीचे नाशिकचे निरीक्षक बापू भूजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना स्वकीयांच्या गद्दारीमुळे पराभव स्वीकारावा लागला, अशी खंत व्यक्त केली. पायात पाय घालून पाडण्याचे उद्योग थांबवा, असा सल्ला देत गद्दारांना सोडणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली.

राष्ट्रवादी भवन येथे देवळाली मतदारसंघातील इच्छुकांची चाचपणी केल्यानंतर ते चांगलेच आक्रमक झाले. तत्पूर्वी काही पदाधिकार्‍यांनी केलेल्या भाषणांचा संदर्भ घेत त्यांनी थेट राष्ट्रवादीतील गटबाजीलाच हात घातला. ते म्हणाले की, इतकी चांगले कामे करूनही भुजबळ यांचा पराभव का झाला हे कळतच नाही. पाडापाडीचे राजकारण बंद करा, नाहीतर भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. सत्ता गेल्यावर तुमचीच कामे होणार नाहीत, तेव्हा अन्य पक्षांकडे हात पसरवणार काय, असा सवालही त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांची जादू ओसरली असून, आता निश्चित राष्ट्रवादी मुसंडी घेईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या वेळी प्रदेश चिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, नाना महाले, माणिकराव शिंदे, प्रकाश नन्नावरे, छबू नागरे, सचिन पिंगळे, कोंडाजीमामा आव्हाड, दीपक वाघ, डॉ भारती पवार, र्शीराम शेटे आदी उपस्थित होते.

या वेळी देवळाली, मालेगाव बाह्य, सिन्नर, नाशिक पश्चिम मतदारसंघातील इच्छुकांची मतेही त्यांनी जाणून घेतली. दरम्यान, गुरुवारी (दि. 7) निफाड, नाशिक पूर्व व मध्य, तसेच मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघासंदर्भात बैठका होणार आहेत.
मतदारसंघनिहाय इच्छुक असे
नाशिक पश्चिम : नाना महाले, शिवाजी चुंभळे, बाळासाहेब सोनवणे, अमोल नाईक, राजकुमार पाटील, छबू नागरे
देवळाली : नानासाहेब सोनवणे, रविकिरण घोलप, रामदास सदाफुले, कविता कर्डक, दीपक वाघ, हरीश भडांगे, भगवान दोंदे, यशवंत शिरसाठ, राजेंद्र जाधव, संतोष सदाफुले, सुनील कोथमिरे, संजय गालफाडे, सुरेखा काळे, विलास पवार, दौलत त्रिभुवन, रतन काळे
मालेगाव बाह्य : राजेंद्र भोसले, अरुण देवरे, डॉ. जयंत पवार
सिन्नर : संदीप लोंढे, बंडू भाबड, राजाराम मुरकुटे