आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal News In Marathi, Gujarat Model, Nashik, Divya Marathi

गुजरातेत नाशिकइतका विकसित जिल्हा दाखवा,छगन भुजबळ यांचे मोदी यांना आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्‍ट्राच्या तुलनेत गुजरात मॉडेल पिछाडीवर असून नाशिक जिल्ह्याप्रमाणे विकसित असा एक तरी जिल्हा गुजरातमध्ये दाखवा असे आव्हान कॉँग्रेस राष्‍ट्रवादीचे उमेदवार तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केवळ राष्‍ट्रवादीनेच विकास केल्याचे सांगत भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर टिकेची झोड उठवली.


मेळाव्यात बोलताना भुजबळ म्हणाले की, मोदीची लाट उत्तर महाराष्‍ट्रात तरी नाही. नाशिकचा विकास केल्याचे सांगितले जाते मात्र शेजारील दिंडोरी अविकसित आहे असे कसे म्हणता येईल. येवला, नांदगाव, कळवणमध्ये जो विकास झाला तो कॉँग्रेस आघाडी सरकारनेच केला. ओझर विमानतळदेखील दिंडोरी मतदारसंघातच आहे. त्यामुळे राष्‍ट्रवादीच्या उमेदवारांनी तसा प्रचार करणे चुकीचे आहे. उलट भाजपाचे खासदार चव्हाण यांनी 10 वर्ष पद भोगूनही जेमतेम 15 ते 16 लाखाच्यापुढे कामेच केलेली नाही. साधा रस्ताही त्यांना बांधता आला नाही. यंदा कोणी म्हणते मी या धर्माचा, या भाषेचा तर कोणी जातीयवादी प्रचार करीत आहे. प्रत्यक्षात मी कोणत्या जाती-पातीचा उमेदवार नसून विकास हाच एकमेव मुद्दा आहे. विकासाची ब्लूप्रिंट माझ्याकडे नाही. समीरला निवडून देताना येवल्याचा विकास हाच मतदारांनी डोळ्यासमोर ठेवला. नाशिकमधील दरडोई उत्पन्न 28 हजार रुपये इतके होते, त्यात तिपटीने वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.


शिरपूर पॅटर्न देशभरात चर्चेत
धुळे लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस राष्‍ट्रवादी आघाडीचे उमेदवार तथा आमदार अमरीशभाई पटेल यांनी सांगितले की, मुंबई, पुणे व नाशिकप्रमाणे धुळ्याचा विकास हाच दृष्‍टीकोन डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. शिरपूर पॅटर्नची तर देशभरातच चर्चा आहे. 70 हजार लोकसंख्येच्या गावात 35 हजार विद्यार्थी चांगले शिक्षण घेत असल्याची बाबही एकमेव आहे. पावसाचे पाणी नद्यामध्ये न सोडता ते जमिनीत जिरवून सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याची कामगिरीही शिरपुरमध्येच केली. हाच पॅटर्न धुळे लोकसभा मतदारसंघात राबवला जाणार असून विकास हाच मुद्दा अजेंड्यावर असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.


महिला आरक्षणाला न्याय देणार
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उच्चशिक्षित उमेदवार म्हणून राजकीय पाटी कोरी असताना शरद पवार यांनी उमेदवारी दिली. एका महिलेला महत्वाची संधी दिल्याने आरक्षणाच्या धोरणाला निश्चितच न्याय मिळेल,असा राष्‍ट्रवादी व कॉँग्रेसच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केला. नाशिकच्या तुलनेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची प्रगती झाली नाही. मात्र या मतदारसंघातील राष्‍ट्रवादीच्या ताब्यातील येवला, नांदगाव व कळवण मतदारसंघात चांगला विकास झाला. ऊर्वरित विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे आगामी काळात उद्दीष्ठ असेल असेही त्यांनी सांगितले.


मुंडे, विलासराव व पवारसाहेबही दिल्लीत
गेलेच ना?

छगन भुजबळ हे दिल्लीत चालले, तर मोठी चर्चा घडली. मात्र महापालिकेतून मी विधानसभेत गेलोच ना. आणि गोपीनाथ मुंडे, स्व. विलासराव देशमुख किंबहुना खुद्द शरद पवार साहेबदेखील दिल्लीत लोकसभेत काम करण्यासाठी गेलेच ना. त्यामुळे त्यात गैर काय असा सवाल भुजबळ यांनी केला. आम्ही रिंगणात उतरलो असून रिंगण जिंकूनच दाखवू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.