आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय पंधरा दिवसांत : भुजबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव- दहा वर्षांपूर्वी तुम्ही मला येथे सन्मानाने आणले. या काळात सर्वात जास्त निधी येवला मतदारसंघासाठी आणत विकासकामे केली, परंतु नाशिकमधील लोकसभा निवडणुकीतील पराभावानंतर मात्र आता मतदारसंघातील गावागावांमध्ये कार्यक्रमासाठी कानोसा घेत असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी सांगितले.

येवला- लासलगाव मतदारसंघातील 42 गावांचे प्रतिनिधी व नागरिकांच्या समस्यांबाबत बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विधानसभेबाबत पंधरा दिवसांत बोलू, असेही त्यांनी सांगितले.