आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal News In Marathi, Nationalist Congress, MNS, Nashik

निवडणुकीचा आखाडा: भुजबळांच्या शिक्षणावर मनसे नेत्यांचा आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्जात शिक्षणाची दिलेली माहिती चुकीची असल्याचा आक्षेप मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या वतीने महापौर अँड. यतिन वाघ आणि अँड. मनीष बस्ते यांनी घेतला. त्यावर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विलास पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार हरकत प्रतिज्ञापत्राद्वारेच आक्षेप नोंदविण्याचे सांगत, हरकतीची वेळ संपल्याने भुजबळांचा अर्ज वैध ठरविण्यात आला.
उमेदवारी अर्जात भुजबळांनी त्यांचे शिक्षण व्हीजीटीआय, मुंबई येथून एलएमई-1 पदवी घेतल्याचे नमूद केले आहे. तर, भुजबळ संस्थापक अध्यक्ष असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या संकेतस्थळावर त्यांचे शिक्षण मॅकेनिकल व इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. त्यामुळे महापौर अँड. वाघ आणि शेकापचे अँड. बस्ते यांनी हरकत घेतली. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी तक्रारही प्रतिज्ञापत्राद्वारेच करण्याचे सूचित केले. हरकतीच्या वेळेत ते सादर करू न शकल्याने भुजबळ यांचा अर्ज वैध असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यामुळे घेतली हरकत
अर्जात व्हीजीटीआय, मुंबई येथून एलएमई-1 पदवी घेतल्याचे नमूद आहे. तर, मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या संकेतस्थळावर त्यांचे शिक्षण मॅकेनिकल व इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे.