आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhagan Bhujbal News In Marathi, Raj Thackeray, Nashik

हे केवळ सत्तेसाठीचे राजकारण; छगन भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी (जि. नाशिक)- टोलच्या मुद्द्यावरून तोडफोडीची भाषा करणार्‍यांना महाराष्ट्र पूर्णपणे माहीत तरी आहे का? असा टोला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी राज ठाकरे यांना लगावला. तसेच राज हे केवळ सत्तेसाठी टोलच्या मुद्द्याचे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे 35 कोटींच्या विविध रस्ता कामांचे भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी राज यांचा खरपूस समाचार घेतला. टोलप्रश्नी समोरासमोर बसा व चर्चा करा, पण उगाचच जनतेची दिशाभूल करू नका. पाणीपुरवठा, शेतकरी, गोरगरिबांच्या प्रश्नांवर हे लोक आंदोलन का करत नाहीत? सगळेच विरोधक केवळ सत्तेसाठी राजकारण करत असल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.