आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Executive Officer Sukhdev Bankar News In Marathi

सीईओंची बदली रद्द करण्यासाठी मोर्चा, जिल्हावासीय फोरमची जिल्हाधिका-यांडे मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झाला नसतानाच शासनाने त्यांची बदली केली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या काळात ग्रामविकासात जिल्ह्याला अग्रस्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांची बदली तत्काळ रद्द करत त्यांना कार्यकाळ पूर्ण करू द्यावा, अशी मागणी नाशिक जिल्हावासीय फोरमने आवाहन मोर्चा काढून जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांकडे भावना पोहोचविणार असल्याचे आश्वासन दिले.
सीईओ सुखदेव बनकर यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, जलसिंचन, पिण्याच्या पाण्याच्या योजना, अंगणवाडी, पोषण आहार यामध्ये चांगले योगदान दिले आहे. त्यांच्या काळातच या योजनांमध्ये वेगाने काम झाले आहे. कार्यक्षम अधिकाऱ्याची अशी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच बदली होणे हे कुठल्याही जिल्ह्यासाठी संयुक्तिक नाही. त्यात समाजाचेच नुकसान होत असल्याने मुख्यमंत्र्यांनीही यात लक्ष घालण्यासाठी फोरमने त्यास विरोध करीत कालावधी पूर्ण करण्याची विनंती केली आहे. जिल्हा परिषदेपासून आवाहन मार्चला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी राजू देसले, एकनाथ मोरे, ज्ञानेश्वर रामकृष्ण, तानाजी जायभावे, संगीता उदमले, श्रीधर देशपांडे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, विमल पोरजे, कल्पना निकम आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सभेवर बहिष्कार
बनकर यांनी प्रशासनावर चांगली पकड बसविल्याने ते उत्तम प्रशासक अधिकारी म्हणून प्रिय होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. बदली रद्द झाली नाही तर मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला आहे. बनकर यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामावर चांगली पकड बसवून कामात प्रगती केली होती. त्यामुळे ते सदस्यांसह नागरिकांमध्येही लोकप्रिय झाले होते. परंतु, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होताच केवळ दीड वर्षातच बदलीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांची स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, नितीन पवार आणि प्रवीण जाधव उपस्थित होते.