आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाजा गेला, नातू गेला तरीही ‘खानेसुमारी’ तीच...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातत्याने खाबुगिरीच्या अाराेपांच्या केंद्रस्थानी असलेल्या पशुसंवर्धन विभागाविषयी तक्रारी लक्षात घेता साेमवारीच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी ‘अाजा गेला, नातू गेला, मात्र खानेसुमारी तीच, अशा शब्दात कारभार सुधारवण्याची तंबी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी याच विभागाचे डाॅ. पुंडलिक बागुल यांना कथित बदली प्रकरणी लाच घेताना पकडल्याची बाब चर्चेचा विषय ठरली अाहे.

लाचखाेरीविषयी तक्रार घेऊन येणाऱ्यांना लाचलुचपत खात्याकडे जाण्याबाबत बनकर यांच्याकडून उघडपणे सांगितले जात अाहे. दाेन दिवसात दाेन लाचखाेरीची प्रकरणे घडल्यामुळे काेणाला भयच उरले नसल्याचेही चित्र अाहे. पशुसंवर्धन विभागाचा कारभार तीन वर्षांपासून गाजत अाहे. तत्कालीन पशुसंवर्धन अधिकारी बी. डी. राजपूत यांची चाैकशी करण्यासाठी समितीही गठित झाली. शिवसेना गटनेता प्रवीण जाधव सदस्यांवर अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला असल्याचा गाैप्यस्फाेटही झाला हाेता. राजपूत यांच्या जागेवर अालेल्या बागुल यांची नियुक्ती अाैटघटकेची ठरल्याचे चित्र असून, मंगळवारी पाच हजाराची लाच घेताना त्यांना अटक केल्यानंतर अनेक बाबी चर्चेत अाल्या. दाेन दिवसांपूर्वी बनकर यांनी पशुसंवर्धन विभागाला सहज भेट दिल्यावर त्यांनी एका वरिष्ठ कर्मचाऱ्याकडे ‘अाजा गेला, नातूही गेला,मात्र खाणेसुमारी तीच’ या म्हणीचा प्रत्यय तंताेतंत तुमचा विभाग बघितल्यावर येताे’, अशी खाेचक टिप्पणीही सीइअाे बनकर यांनी केली हाेती.

दाेन दिवसांत दुसरा सापळा यशस्वी
इगतपुरीतभविष्य निर्वाह निधी प्रकरणाशी संबंधित २०० रुपयांची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने पकडले हाेते. दुसऱ्याच दिवशी डाॅ. बागुल यास लाच प्रकरणात पकडल्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शक प्रतिमेला तडा गेल्याचे चित्र अाहे.

..तर थेट संपर्क साधा
जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन विभागाशी संबंधित भ्रष्टाचार अडवणुकीचा प्रकार हाेत असेल तर नागरिकांबराेबरच कर्मचाऱ्यांनीही थेट संपर्क साधावा. नावाची गुप्तता राखून कारवाई केली जाईल. -केदा अाहेर, कृषी पशुसंवर्धन सभापती
बातम्या आणखी आहेत...