आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून वनसंरक्षकाची आत्महत्या, नाशिकमधील घरातच घेतला गळफास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वन खात्यातील वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मुख्य वनसंरक्षक अधिकारी हिंमतराव नामदेव पाटील (58) यांनी सोमवारी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

हिंमतराव पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी व खात्यातील वरिष्ठांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. पाटील यांच्याकडे चार जिल्ह्यांचा कार्यभार होता. सेवानिवृत्तीसाठी केवळ दोन महिने बाकी असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

पाटील हे मनमिळावू व अतिशय चांगले व्यक्ती होते. मोठय़ा पदावर असतानाही त्यांनी सामाजिक कामे केली. त्यांचा मानसिक छळ करणारे खात्यातील वरिष्ठ अधिकारी कोण आहेत, पाटील यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ कोणी आणली? या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी दिलीप वाघ, दीपक वाणी, जयेश पटेल आदींनी केली आहे.

छायाचित्र - मुख्य वनसंरक्षक अधिकारी हिंमतराव पाटील