आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chief Minister Calling Nashik City Development Plan Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री मागवणार नाशिक शहर विकास आराखडा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेचा शहर विकास आराखडा शासनाने जाहीर करण्यापूर्वीच काही लोकांच्या हाती लागल्याने संभाव्य गैरप्रकारांना आळा बसण्यासाठी या आराखड्याला स्थगिती देऊन त्याऐवजी टी. पी. प्लॅन मंजूर करावा, अशी मागणी शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तत्काळ अहवाल मागून निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विकास आराखड्याविषयी माहिती दिली. सध्या टाउन प्लॅनिंगविषयीचे विधेयक राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्याने त्यावर स्वाक्षरी होईपर्यंत नाशिक महापालिकेच्या विकास आराखड्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सध्या बनविण्यात येत असलेल्या आराखड्यात नवीन रहिवासी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, विविध आरक्षणे आणि रस्त्यांसाठी मोठय़ा प्रमाणावर आरक्षण ठेवले जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पालिकेची एकूण 542 आरक्षणे आहेत. मात्र, त्यापैकी अनेक आरक्षणांविषयी कलम 127 नुसार पालिकेला नोटीस आलेल्या आहेत. एकूण आरक्षणांसाठी आवश्यक ती तरतूद पालिकेकडे नाही. त्यामुळे पुढील आरक्षणे रहिवासी क्षेत्रासाठी कुठलेही आरक्षण लागू न करता टाउन प्लॅनिंगच्या आधारे विकास करण्यात यावा, अशी मागणी शिष्टमंडळातील नगरसेवक उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे, गटनेते लक्ष्मण जायभावे, शैलेश कुटे यांच्यासह नांदूर-मानूर, आडगाव, मखमलाबाद यासह अनेक ठिकाणच्या शेतकर्‍यांनी केली आहे.